Posts

Showing posts from March, 2024

आणि शहरे,गावे सुंदर दिसू लागली!!!!!!!

देशातील नागरिक आतुरतेने लोकसभा निवडणुकीची  वाट पाहत असताना, नुकताच देशाच्या निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन देशभरातल्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या शहरापासून गावापर्यंत मिळेल त्या जागेवर  विवाहाची जाहिरात, वाढदिवसाची जाहिरात, पदाधिकारी म्हणून जाहिरातीचे  मोठ,मोठे  रंगीबेरंगी  फलकाची भाऊ गर्दी आपण सर्वांनी पाहिलेली आहेत. हे फलक लावण्यावरून गावागावात गटागटाची भांडणेही होत होती. निवडणुकीची, आचारसंहिता लागू झाली, आणि ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका  मध्ये लावलेले मान्यवरांचे फोटो उतरवण्याची हिंमत कर्मचाऱ्यांना होत नव्हती. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने दिवस-रात्र हे बॅनर उतरवण्याचे काम जोमाने होऊ लागले. या दोन-तीन दिवसातच विद्रूप दिसणारे गाव. शहर. हे बॅनर उतरवल्याने अतिशय सुंदर असे दिसू लागल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला! एवढ्या मोठ्या प्रमाणावर साफसफाई कशी सुरू झाली, काही जणांना प्रश्न पडला. मित्रांनो आचारसंहिता जेव्हा शेषन देशाचे निवडणूक प्रमुख होते. तेव्हापासून आचारसंहितेचे काटेकोर पालन होऊ लागले. त्याचाच परिणाम प्रत्येक जिल्ह्याचे जिल्ह...