Posts

Showing posts from November, 2020

नातेसबंध!!!!!!!

*नाती जीवनात अतूट अशीच पूर्वीच्या काळात होती.त्यांना जपले जात होते. तेही आपल्या कुटुंबात एकमेका बद्दल आदर ओत प्रोत वहात असे,जेष्ठ आणि वरिष्ठ यांचा आदर राखला जात होता.यामध्ये बहीण-भावाचे नाते अतूट असायचे लग्न न झालेल्या बहिणीची गावात कोणी छेड काढली तर एकट्याने अथवा कुटुंबातील भाऊ व गल्लीतील मित्रांसोबत त्याची धुलाई झालीच म्हणून समजाआणि तेव्हा कळले आपल्या पूर्वजांनी रक्षाबंधन, भाऊबीज हे सण आपल्यात का?निर्माण केले.मात्र या नात्याला सुद्धा  सध्याच्या काळात दृष्ट लागली. परवा एका नातेवाईकच्या हळदी समारंभाला गेलो होतो.कोविड-19 मुले साधारण 30 ते 32  नातेवाईक उपस्थित होते.अंगणातील मांडवात घरातील कुटुंब सख्के असून देखील लांब लांब बसली होती शेजारी बसलेल्या एकास विचारलं काय चाललंय हल्ली घरामध्ये मी बऱ्याच वर्षानी गेलो असल्याने मी प्रश्न विचारला?माझे कडे पाहून म्हणाले 10 लाख रुपये गुंठा झाला आहेना. भावानी बहिणीला हिस्सा दिला नाही म्हणून हे असे.                    मित्रांनो वडिलांचे खूप पूर्वी निधनानंतर1 ते 2 असलेल्या बहिणींनी आपल्या भावासाठ...

अलिबाग कराचा सलाम

*डॉ. विजय सुर्यवंशीना अलिबाग कराचा सलाम*🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐अलिबाग समुद्र किनारी आपण भारतीय सैन्य मध्ये अनेक युध्दात कामगिरी बजावली होती असा टि. के. सी.55हा 37 टन वजनाचा 28 मीटर लांब व 12मिटर रुंदीचा रणगाडा अलिबाग समुद्र किनारी आणीत आहोत असे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या वेळचे जिल्हा धिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले होते आणि आज अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ठरलेल्या जागेवर जातीने लक्ष घालून त्या ऐतिहासिक रणगाड्याला स्थापन केले. डॉ. विजय सूर्यवशी रायगड किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खूप अभिमान आणि आदर असणारे रायगड ची राजधानी अलिबाग येथे पर्यटन साठी वेगळे काहीतरी करायचे म्हणून अलिबागचे आकर्षण लहान मुलांना व्हावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे कायदेशीर बाबी पूर्ण करून हा ऐतिहासिक रणगाडा मिळविला व त्याची स्वछता,रक्षणासाठी अलिबाग नगरपालिकेने करावे त्या प्रमाणे आज घडले.रायगड आणि अलिबागचे नाव जगात प्रसिद्ध आहेच,अलिबागची जगप्रसिद्ध वेध शाळा,हिराकोट तलाव,आग्रे स्मारक, आर,सी,एफ(अभ्यास सहली,विद्यार्थी आणि शेतकरी) कुलाबा ,खांदेरी- उंदेर...

मन व्यवथापन

   आपले अनमोल जीवन जगताना अनेकांची हळवी,आनंदी, कडक मनाचे अनुभव आपण घेत आलो आहोत.त्या मध्ये कधी नव्हे ती आपल्या जीवनात कोरोनारीच्या महामारीचाअनुभव आपण घेतले आहेत.सरकारी सूचनांचे काटेकोर पालन करून दुसऱ्याला मदत करण्याचे आमचेही मन आम्ही अनुभवले आहे.कालच मित्र भेटला त्यालाही कोरोनाला प्रसाद मिळाला होता त्याने सरकारी रुग्णालयाचा अनुभव घेतला,अगदी पहिल्या दिवसापासून त्याच्या मनाला उत्तम साथ देत होतो.काही होणार नाही डॉ कटराच्या सल्ल्यानुसार वाग आणि या भयंकर रोगावर त्याने मात केली 10 किलो वजन कमी झाले बरा होऊन महिना झाला तरी सायंकाळी समुद्र किनाऱ्यावर का?येत नाही तर म्हणतो मला भीती वाटते .मला माझे मन सांगते की त्या रुग्णालया समोरून जायचे नाही मन त्याचे घाबरू लागले पण अश्या मित्रांना आपण भेटून त्याच्या मनाची भीती घालविण्यासाठी वेगळी ऊर्जा देण्याचे काम केले पाहिजे.                           एक मित्र कोरोनाला घाबरून पुण्याला जातो असे सांगू लागला सर्व ठिकाणी कोरोनाची भीती  वाटते म्हणून जागा बदलून कसे चालेल.सरकारी नि...

मास्क नाही प्रवेश नाही

मास्क नाही प्रवेश नाही😷😷😷😷😷😷😷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 कोरोना च्या महामारी पासून आपल्याला आपला देश वाचवायचा आहे. आता गरज आहे सरकारी सूचनांचे पालन काटेकोर पणे करून आपले कुटुंब  आपले मित्रपरिवार च्या सुरक्षेसाठी मस्कचा कसा वापर होतोय हे अतिशय महत्वाचे आहे. आम्ही 2015 पासून आपत्ती व्यवस्थापनात आहोत. रायगड जिल्ह्यातील 1000 हजार ग्रामसेवक आणि सरपंच, राज्यभरातील 1000 पोलीस पाटील यांना प्रथम मास्कचा वापर का? आणि कसा करावा हे सांगितले त्याचे कारण  लोकांसोबत ग्रामपंचायत हद्दीतील दररोज किमान 50 नागरिक भेटतात. मोठ्या शहरातून येणारे  नागरिक जेव्हा गावी येतात ते सवयीप्रमाणे मोठ्याने बोलतात आणि त्यांच्या तोंडामधून अनेक वेळा थुंकी चे थेंब नाका-तोंडावर पडतात "बीहेपीटॉईज" नावाचा रोग होत असे, म्हणजे आता ही होतो आणि आता करोनात काही नागरिक तोंडाच्या म्हणजेच नका तोंडाच्या खाली मास्क लावून फिरताना दिसतात. काहीजण खिशातच ठेवतात .मागील वर्षभरात अनेकांना मास्क भेट देऊन सुध्दा फरक पडत नाही असे पाहुन, सांगून सुद्धा फरक पडत नव्हता मात्र गेल्या काही महिन्यात शेजारच्याला जेव्हा 108 रुग्णवाहिका शेजारी ,...

आठवणीतील दिवाळी

आजच्या दिवशी सकाळी6 वाजता आईने झोपेतून उठविले तेव्हढ्यात बापूने म्हणजे वडिलांनी सांगितले बूट पोलिश कर पोलिसांना कुठलाही सण असला तरी जनतेच्या सेवे साठी जावेच लागते त्यानी युनिफार्म चढविला होता व माझे कडे पहात होते ते निघून जातात आईने गरम पाणी टाकले होते उटणे सोबत दिले होते आणि जवळचा शेत बांध वरून आणलेले चिरांठु घेतले तोपर्यंत बहीण -भाऊ उठले तो पर्यन्त मला चाळीतील 3 नंबर रम मधील पवार मावशी कडे एक पातेले घेऊन जाण्यास सांगितले पवार काका हे पोलादपूर चे आणि बापूचे सहकारी पवार मावशीने गव्हाचे पीठ दिले आम्ही तांदुळ भात-भाकरी खाणारे पुढे पवार काकांचा अपघाती मृत्यु झाला आमचा आधार तुटला मावशींना पोलीस अधीक्षक यांनी अलिबागला कार्यलयात नोकरी दिली त्याचे 3 भाऊ पोलीस दलात कार्यरत आहेत आजही मी पोलादपूरला गेलो तर  नतमस्तक होतो अशीही परोपकारी माणसे असतात अश्या आठवणी.आमची1 बहिण आणि 3 भाऊ अतिशय सुख समृध्द आहेत.कपाटातून आईने नवे असलेले जुनेच कपडे दिले,आणि रात्री केलेल्या फक्त शंकरपाळी फराळ दिली व सांगितले कोणी चाळीतल्यानि विचारले तर सांगायचे चकली,करंजी,लाडू खूप झाले,छोटे भाऊ बहीण बाहेर फटाके म्हणजे टिक...

नाती विसरू नका!!!

नाती विसरू नका।                             रात्री 11.30 वाजता पोस्ट मास्तर याचा फोन आला माझे लैपटॉप वर लिखाण चालू होते .फोन घेतला ,सर आमचे एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत त्याना सकाळी पनवेल येथे रुग्णालयात नेणें आहे 108 रुग्णवाहिका सकाळी पाहिजे आहे.फोन कॉन्फरन्स वर होता मी सकाळी 10 वाजता रुग्णालयात पोहचतो असे सांगितले त्याच वेळी कोरोनाग्रस्त च्या श्रीमतीने पोष्ट मास्तर ला सांगितले, मला पैसे लागतील ,किती ?50 हजार वेळ अतिशय गँभीर होती आणि ते दोघे कर्मचारी पोस्ट मधेच कामाला   असल्याने पोस्ट मास्तर म्हणाले काही काळजी करू नका पाठवतो   खरे तर दोघेही कर्मचारी दूरच्या जिल्हा मधील कोणी नातेवाईक नाही, पोस्ट मास्तर यांनी पोस्ट मधील जबाबदार अधीकारी सोबत 50 हजार रुपये पाठविले आणि मीही वेळेवर पोहचले तेथे रुग्णवाहिकेत रुग्णालय कर्मचारी यांनी रुग्णास आणले मात्र त्याची ओषध व सामानाची पिशवी मात्र त्याच्या  पत्नीने न ठेवता पोस्ट अधिकारी याला रुग्ण वाहीकेत   ठेवण्यास सांगितली. आम्ही कोरोना ...