✒️मी गुणवंत कामगार!
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर थळ येथे 1979 ला मटेरियल कलेक्टर कमवाहन चालक म्हणून नोकरीस लागलो. कारखान्यासाठी लागणारे साहित्य मुंबई, ठाणे, पुणे येथून आणावयाचे काम माझे होते. कारखान्याला लागणारी चार ते 26 चाकी वाहने सुद्धा आणली, पेण ते थळ रेल्वे लाईन कारखान्याची सुरू झाली. मध्य रेल्वे कडून 2 इंजिन खरेदी करण्यात आली. जीवनात शिकत राहायचे ही भावना असल्याने माझी जनरल मॅनेजर यांनी रेल्वे इंजिन पायलट म्हणून नियुक्ती केली. प्रशिक्षणासाठी मी, माझी पत्नी जयश्री, माझी कन्या बाळ पल्लवीला घेऊन शकूरबस्ती, दिल्ली येथे प्रशिक्षणास गेलो, आमची तिघांची पहाडगंज नवी दिल्ली येथे एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती. आणि तेथे मला रेल्वे इंजिन चालविण्याचे अधिकृत परवाना मिळाला. त्यावेळी मी पानिपत, मसूरी, हरिद्वार,ऋषिकेश येथे शनिवार रविवार पाहण्याचा आनंद घेतला. जाताना राजधानी एक्सप्रेस येताना विमान प्रवास आयुष्यात प्रथम अनुभवला. आम्ही आर.सी.एफ. थळ मध्ये सुरुवातीला 19 जण होतो, नंतर वाढ होऊ लागली येथे 23 वर्ष नोकरी करून व्ही.आर.एस. घेऊन समाजसेवा करू लागलो.छायाचित्रण वाचनाची लेखनाच...