✍️जीवन सुगंध!!!!!
मी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझरच्या नोकरीनिमित्त माझे गाव शहाबाज सोडून मी कुरूळ येथील निसर्गरम्य वसाहतीत रहावयास आलो. 30 वर्षांपूर्वीचे समुद्रकिनारी वसलेले अलिबाग गाव आपलेसे झाले. सुट्टीत सार्वजनिक वाचनालयात नियमित जाणे असल्याने एकदा रस्त्यात चक्कर येऊन आदिवासी* *बांधव पडलेला दिसला त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेल्याने त्याच्यासोबत मैत्री झाली,तो एक दिवस आड वररसोलीच्या तलावातून सुंदर ताजी कमळे, विकावयास आणत असे,त्या वेळेपासून आदिवासी समाजाला मदत करावयास हवी अशी प्रेरणा या लहान्यामुळे मिळाली. पुढे अलिबाग लायन्स क्लब चा सभासद. पदाधिकारी. ते 25 व्या वर्षाचा अध्यक्ष झाल्याने या समाजासाठी कायम आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, श्री* *सेवा मेडिकल ट्रस्टचा अध्यक्ष असल्याने 24 तास रुग्णवाहिका सेवेचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देणे, पोलीस ठाणे तहसील कार्यालयात, रेशन कार्ड बनवून देणे व विविध अडचणींना मदत हे कायम होत आले. त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, व्यसनमुक्तीसाठी शिबिरांचे आयोजन करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे रायगड व रत्नागिरी जिल्ह्या...