Posts

Showing posts from November, 2024

✍️जीवन सुरक्षेचे तीन तेरा!

  महाराष्ट्रामध्ये हजारो व्यक्तींनी आपल्या स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना घेऊन आपल्या जीविताची काळजी घेतली आहे मुळात समाजातील मोठमोठे व्यवसायिक, निवृत्त सरकारी अधिकारी, आमच्यासारखे पत्रकार यांनी आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी शासनाकडे म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला. त्याबाबतची संपूर्ण  जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून चौकशी होऊन अर्ज केलेल्या व्यक्तीस  स्वरक्षणार्थ शस्त्र परवाना दिला जातो. त्यानंतर त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते शस्त्र भारतीय बनावटीचे अथवा परदेशी बनावटीचे घेतात त्यांना खरोखरच आपल्या जीवाची भीती असतेआणि त्यामध्ये राज्यात जेव्हा कधीही विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका येतात त्यावेळी दिल्ली येथून निवडणूक आयुक्तांचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पोहोचतात की ज्या लोकांकडे शस्त्रे आहेत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे जमा करावी असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोहोचतात आणि स्थानिक पोलिसांकडून शस्त्र जमा केली जातात मग त्यांच्या मौल्यवान जीवाचे काय हा प्रश्न निर्माण होतो. आमच्याकडे ही शस्त्र परवाना आहे मागील लोकसभेच्या वेळी पोलिसांनी सूचना केल्याप्रमाणे शस्त्र जमा क...

✍️औद्योगिक सुरक्षा दिन

आशिया खंडातील सर्वात मोठा फर्टीलायझर चा कारखाना अलिबाग तालुक्यातील थळ येथे माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रमुख्यमंत्री  बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्यामुळे आला आणि अलिबाग तालुक्याचे सर्व दृष्टीकोनातून कायापालट झाला सन 1979 साली मी सामान संकलक व वाहनचालक म्हणून कारखान्यात  कामाला लागलो. कारखान्याला लागणारे सामान ४चाकी पासून १० चाकी वाहने मुंबईतून थळ येथे आणण्याचे काम मला करावे लागे  म्हणून चेंबूर येथील कंपनीत सुरक्षाविषयक होणाऱ्या कार्यशाळेत मला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली, कारखान्याने थळ येथून पेंण पर्यंत रेल्वेचे रुळ टाकले, आणि २ रेल्वे इंजिन विकत घेतली. लोको ऑपरेटर म्हणून प्रशिक्षण घेण्याची नवी दिल्ली येथे रेल्वेच्या  सकुरबस्ती येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये शिक्षणाची संधी प्राप्त झाली. कारखान्याच्या कडून वसाहतीत गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्याची सचिव म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आली होती पुढे मी वेळेचा सदुपयोग म्हणून समाजकार्य व  पत्रकारिता  करू लागलो कारखान्याची प्रगती जोमाने होऊ लागली आणि मला कारखान्यात पहिला महाराष्ट्र शास...