अदिवासीनां संधी देणे
🏹 ऑलिम्पिक मधे अमेरिका,जपान,व अनेक देशातील मुले,मुली नेमबाजीत चमकतात मग आपला भारत देश का?मागे असा विचार मनात आला ,महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालयातर्फे आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना धनुर्विद्या शिकविण्याची व्यवस्था करावी. असे मागणी पत्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉक्टर विजयकुमार गावित यांना पत्राद्वारे आदिवासी सेवक डॉ. जयपाल पाटील यांनी केली आहे.रायगड वर रत्नागिरीजिल्ह्यातीलआदिवासी प्रकल्पांतर्गत 14 आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना आपत्ती सुरक्षा विषयक प्रशिक्षण दिले असल्याने यावेळी मुलांना गलोल म्हणजेच बेचकी व काठीच्या धनुष्यबाणाची सुरक्षा कशी घ्यावी,ज्यामुळे अनेक मुलांचे डोळ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र नेमबाजी मध्ये ही मुले अतिशय निष्णात आहेत. यांना आश्रम शाळेत इयत्ता ५वी पासून धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिले. तर ती जिल्हा, राज्य, देशपातळीवर नेमबाजी मध्ये प्रगती करू शकतात व पुढे ऑलिम्पिक मध्येही पोहोचू शकतात. यासाठी शाळेमध्ये असलेले पी.टी.च्या शिक्षकांनाधनुर्विद्येबाबत प्रशिक्षण दिले,प्रत्येक शाळेत धनुर्विद्येचा संच दिला, तर भविष्यात ऑलिम्पिक मध्ये महा...