Posts

Showing posts from October, 2024

✍️कायम लक्षात राहणारी दिवाळी!

 आमचे वडील रायगड पोलीस दलात शिपाई म्हणून खालापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. घरात आईसोबत बहीण आणि आम्ही दोन भावंड होतो. तेथील रायगड जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीच्या वर्गात मी शिक्षण घेत होतो. महाजनांच्या चाळीत आम्ही राहत होतो आम्ही पोलिसाची पोर म्हणून आमच्याकडे बघण्याचा शेजाऱ्यांचा दृष्टिकोन त्याही काळात एक वेगळा होता.  मात्र शाळेत आम्ही हुशार होतो, माझा वर्गमित्र प्रकाश जंगम चे घर समोरच होते त्याचे वडील टेलर काम करीत असत त्या काळातील तो सुखी कुटुंबातील होता.पुढे तो रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यात गोडाऊन, तपासणीस म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाला. आजही त्याच्या कुटुंबासहित सर्वांची भेट होते, आणि दिवाळीच्या वेळेची आठवण येऊन डोळ्यातून अश्रूधारा निघतात. सोबत अशोक मारवाडी याच्या वडिलांचे दुकान होते , दोन-चार मित्र जीवाचे होतोअजून आला नाही त्या काळात सणानिमित्त दोनशे रुपये पगारातील ॲडव्हान्स मिळत असे त्यामुळे आमच्याकडे दिवाळीचा फराळ झाला नाही म्हणून आईने सांगून ठेवले की कोणी विचारले तर फराळ उत्तम झालेला आहे असे सांगावे  सुट्टीमुळे आम्ही मित्र गावाशेजारील भाताच्य...

✍️ओरिसात चक्रीवादळाने नुकसान कमी होऊ दे!

 निसर्गाच्या कोपामुळे    ओरिसा मध्ये दाना चक्रीवादळ समुद्र मार्गे जवळ येत असताना काय नुकसान होईल हे सांगता येत नसल्यामुळे तेथील  जिल्हा प्रशासन मदतीसाठी सतर्क झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील ज्या गावांना जास्त धोका संभवतो तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे कार्य जोरात सुरू असून तेथील जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने केंद्र सरकारच्या गृह खात्याकडून आलेल्या आदेशाने तेथील समाजसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती मित्र व आपत्ती मैत्रिणी याचे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात दिले असून तेही प्रशासनास मदत करण्यास तत्पर झाले आहेत. हाच अनुभव रायगड जिल्ह्यात २  वेळा आलेल्या चक्रीवादळामुळे प्रत्येक तालुक्यात१५-२०  आपत्ती मित्र -आपत्ती मैत्रीण यांना प्रशिक्षण दिलेले आहे. आम्ही रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे आदिवासी आश्रम शाळा,अनेक शाळा,महाविदयालयात, ग्रामपंचायतीत आम्ही प्रशिक्षण दिलेले आहेत. सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेले अनेक गावांना धोका निर्माण झाल्याचा अहवाल केंद्र सरकारने पाठवल्यामुळेच नुकताच भर पावसात आम्ही रा...