ज्येष्ठांची मनोगत
*🙏जीवन सुगंध* आपल्या जीवन प्रवासात वेळ हा शब्द आपल्या सोबत मरणाची ती वेळ येईपर्यंत राहणार आहे, रहात आहे. मात्र त्याचा सदुपयोग केला तर कोणत्याही वयात आनंद घेता येतो. सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात असल्याने हजारो मित्र मैत्रिणी आहेत. आणि दिवसेंदिवस वाढत आहेतच. त्यातील अनेक जण सरकारी नोकरी. कारखान्यातून वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर,व्ही. आर. एस. सेवानिवृत्त होऊन. आपल्या आवडीच्या घरी राहतात. त्यातील अनेक जण धनधान्य विपुल,सुखवस्तू , मुले, सुना नोकरी करीत असल्याने अनेक जण एकटे पडतात. आणी करायचे काय? असा अनेकांना प्रश्न पडतो. मुळात आपल्या लहानपणी काही गोष्टींची आवड असून सुद्धा सवड नसते तर आईवडिलांच्या आवडीने शिक्षण घेऊन नोकरी,उद्योग व्यवसाय केलेला असतो. आणि मनातल्या आवडी राहून गेलेल्या असतात.आपल्यात असलेले गुण ओळखा,आपणास जीवनात आलेले अनुभव, नव्या पिढीला सांगा, लिहा, सध्याच्या काळात सोशल मीडिया मार्फत ते हजारों लोका पर्यंत पाठवा. मी एवढे वर्ष हे केले ते केले विसरा, मनात राहून गेलेला मार्ग बदला, आणि आनंद मिळवा. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. परिसरातील आश्रम, मंदिर, चर्च,...