Posts

देशसेवेत सामील व्हा

✍🏻 निवृत्तीनंतर काय? विचार  करणाऱ्यांसाठी,आपल्या  ज्ञानाचा वापर  समाजासाठी कराच आनंद  मिळुन  देशसेवेत सामील व्हा.  मी राष्ट्रीय केमिकल आणी फर्टीलायझर लि.भारत सरकार चेंबूर येथील  कारखान्यात काम करीत होतो. खेळाची आवड असल्याने त्या काळात  आर.सी.एफ.चेंबूर च्या क्रिकेट टीम चा विकेट  किपर होतो,माझा जोडीदार मित्र हा बलविदंरसिंग सिंधु  होता. तो पुढे महाराष्ट्र संघात पोहोचला , खेळात एकदा बाॅलर गोलंदाजीच्या वेगवान फेकीने माझा डाव्या हाताचा अंगठा  क्रॅक झाला आणी क्रिकेट  कायमचे बंद झाले आणी थळ येथे आलो ,अंगामधे खेळाडु वृती असेल आणी मित्र परिवार उत्तम असल्यास संधी  असतेच अलिबाग जेल समोर शासनाचे अथिँक  कार्यालयात माझे मित्र श्री.प्रदिप पाटील हे अधिकारी असल्याने ते आणी त्याचे सहाय्यक  बॅडमिंटन खेळत असत,आरसीएफ चे मी,माझे 2बंधु विश्वास, सतीश, रवींद्र लोंढे,विनय गोविलकर  असे रोज एकत्र येऊन  सराव करत होतो,थोडा महागडा खेळ पण तंदुरुस्त  व आनंद देणारा बॅडमिंटन खेळाची आरसीएफचा संघ म्हणून पर्सनल  अधिकारी श्री.एम.डी...

✍🏻वेळ आली आहे,काळजी घेण्याची!

सध्या अचानक  थंडीची लाट वाढली आहे,ती सुखकर आहे,कोकणात आंबा मोहरत आहे,शेतकरी  खुषीत असुन सकाळी शेकोटीत शेकत आहेत पण खोकल्याने बेजार होउन,नाकामधुन गंगा,यमुनेचे तुषार कपड्यांवर पडत असताना टिंगल टवाळीला मित्रांच्या  सामोरे जावे लागते मग डॉक्टरांची भेट कफसिरप आणी गोळ्या सोबत घरी यावे लागते.मागील 15दिवसात अनेक तालुक्यात कफ आणी सदींचे रुग्णाची  वाढ भयानक वाढली आम्हीच  आजारी पडलो. एकाच वेळी एकाच आजाराची आपत्ती, काहीतरी गडबड आहे असे मनात  जाणवू लागले,एका मित्राच्या  आईचे निधन झाले,कारण कफ अडकल्याने सांगितले. माझेही नाकामधुन व फुफ्फुसात खोकल्याने बेजार केले आहे,आपले पंतप्रधानश्री.नरेंद्र मोदीजीनी याबाबत  जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कडुन  अहवाल मागवून या अचानक आलेला मोठा प्रमाणातील कफ,जो फुफ्फुसात व घशातील  नलिकेत घट्ट होउन अतिशय त्रास अगदी मृतुपर्यत  वाटचाल होतेय यांचा संशोधकांना तपास करण्याची विनंती आहे.याबाबत काही नागरिक कोविड लसीचा परिणाम नसेल  ना?,सगळेच हुशार, अशीही चर्चा  औषधाच्या दुकानात  करताना जाणवली, पत्रकार  तुमच...

✍🏻आठवण बिबट्याची!

 आमची शेती अलिबाग तालुक्यातील कुणे गावातील जंगला जवळ आहे तेथील आम्ही अनुभवलेला बिबट्याचा प्रसंग आपणास सांगत आहे अलिबाग जवळील वेशीवर  वेश्वी येथील छपाई मशीन असलेला आमच्या मित्राच्या बहिणीचे लग्न अदोशी येथे झाले. त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने आम्ही त्यावेळी माझे शेतघर दांडेकर विहिरीच्या बाजूला होते.  सध्या पनवेलला राहत असलेला आमच्या कुटुंबातील सर्वात लहान भाऊ जो आता वकील होऊन नोटरी म्हणून  पनवेल येथे राहत आहे शेतावरच्या घरामध्ये तो माझी मोठी कन्या पल्लवी शेतगडी गजा काका व त्याची सौभाग्यवती होती मी माझा छोटा चिरंजीव सत्यम आणि सौभाग्यवती जयश्री आमच्या हिरो होंडा वर अंदोशी येथे गेलो होतो मित्र परिवारामुळे येताना उशीर झाला आणि सायंकाळचे सात वाजले होते काळोख पडायला सुरुवात झाली होती घराकडे जाताना रस्त्यामध्ये पाणथळ भाग होता तिथेच पाण्याचे टबके होते.चिखलाचा रस्ता असल्याने कसरत करतच मोटरसायकल न्यावी आणि आणावी लागत असे, आणि पुढच्याच वळणावर डबक्यामध्ये पाणी पीत असलेला बिबट्या  सौभाग्यवतीला दिसला आणि तिने सांगितले गाडी थांबवा समोर बघा बिबट्यानेही आमच्याकडे पाहिल...

✍🏻जेष्ठ नागरिकांनी आपले अवयव जपा!

जेष्ठ नागरिक नोकरीतून निवृत्त झाले की ,अथवा शेतकरी,कामगार यांची मुले मोठी होउन नोकरीस लागलेली आपल्या आई-वडील यांना आराम व नातवंड यांना सांभाळत रहा असा गोड सल्ला देतात. मात्र जेष्ठ पुरुषास बाजार हाट, मच्छी, भाजी मार्केटला जावे लागते त्या साठी 2चाकी तर व्यायाम म्हणून सायकल घेऊन अनेक जण जातात, अश्या वेळेस हमरस्त्यावर जोराने आणी वेडी वाकडी चालविणारी तरुण पिढी कडे रस्त्याच्या पलिकडे जाताना कायम दुतर्फा लक्ष ठेवावे ,आपली सायकल अथवा 2चाकी ओळखीच्या ठिकाणी ठेवून रस्त्यावरून जाताना आपला उजवा हात समोर दाखवून सावकाश रस्ता ओलांडून जावे,म्हणजे अपघाताला सामोरे जावु नये,घरात कितीही मागे लागलेली नात अथवा नातु यांनी आजोबा,आजीने सोबत नेऊ नये,छोटी मुले आपले ऐकत नाहीत कसेही धावतात त्या मुळे अनेक अपघात झाले आहेत, आणी अश्या घटनेमुळे चांगल्या आनंदी संसारात सासु -सुन,मुलगा,वडील यांच्यात कायम दरी निर्माण होईल. आजीनी सुध्दा लहान मुलांवर काटेकोर लक्ष दिले पाहिजेत, आपले मोबाईल अजिबात लहान मुलांना राग आलातरी देऊ नये.मुलांचे आई-वडील घरात येईपर्यंत लक्ष ठेवून आपल्या जबाबदारी तुन मोकळे व्हावे, आपल्या औषधाच्या गोळ्य...

भांड्यांचा अहेर नको

✍🏻 हिन्दु धर्मिया मधे घरात मुला-मुलीचे लग्न कार्य म्हणजे  आनंदाचे दिवस घरातील  आबालवृद्धांना आवडीचे नवीन कपडे खरेदी,मुलीचे लग्न म्हटले आणी जावई आम्हास हुंडा नको फक्त मुलगी द्या असे म्हणुन साखर पुडयास जावयाला लोक लज्जे स्तव सोन्याची भेट मुलीच्या वडीलास द्यावी लागते.आणी लग्नाच्या वेळी सोन्या चांदीचे दागिने मुलीला आईवडील करतातच.आणी लग्नाचा हाॅल,जेवणाचा खर्च दोन्ही कडील मंडळी अर्धा करते मुलीची सासुबाई  घर पाहण्यास आल्यावर सांगते आमच्या नातेवाईक यांचा मानपान साड्या, शर्ट,पॅन्ट पीस,फेटा किव्हा टोपी देऊन करावा.म्हणजे हुंडा न मागता खर्च आलाच.आता नातेवाईकांचा  पसारा मोठा होता.महागडी लग्न पत्रिकेत खाली मोठी टिप असते भांड्याचा अहेर  नको म्हणजेच पैसे पाकिटात दिले तरी चालतील  हे ओघाने आलेच.बिचाऱ्या मुलीच्या वडीलास लाखो रुपयांचा खर्च त्याला एक प्रकारे मदतच.आता भांड्यांचा अहेर जुन्या काळात दुरुन विहीरीचे पाणी आणावयास लागत असे ते घरातील भांड्यात, टाकीत  साठवून ठेवत असत.आता सरकारने घरातच नळाचे पाणी दिले आहे.त्यामुळे हंडे,टाकी यांची गरज कमी होउ लागली असुन तांबट व काराग...

रायगड जिल्ह्यातील पथदिवे

Image
✒️रायगडात अंमलबजावणी,राज्यात कधी होणार प्रतिक्षेत! संपूर्ण  रायगडातील   ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय येथे आपत्ती प्रशिक्षण देण्याची देशसेवा सुरू आहे.सकाळी 12 तर दुपारी 3वाजे पर्यत पथदीवे सुरु रहातात कारण काही ग्रामपंचायत मधे कमी कर्मचारी,यामुळे गावातील  निवृत्त कर्मचारी ,समाज  सेवक पथदिवे  चालु,बंद करतात  जर ते बाहेर गावी गेल्यावर आपत्ती येत असायची,  गावात  पथदिवे सुरु असल्याचे वेळ,दिनांक यांची अनेक छायाचित्र रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील(आता ते जिल्हाधिकारी म्हणुन गेले आहेत. )अतोनात वीज बिला बाबत वेळ नियंत्रक बसवावेत असे   दिनांक 9/7/24 रोजी असे पत्र दिले.याबाबत सखोल अभ्यास करून 4/04264/20124 रोजी रायगडातील गटविकास अधिकारीनां पथदिवेंना सायंकाळी 7वाजता सुरू व सकाळी6 वाजता बंद होतील असे वेळ नियंत्रक बसवावेत असे 23/7/24 रोजीचे श्री.राजेंद्र  भालेराव उपमुख्य  कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत  यांनी काढले,त्यामुळे जिल्हा परिषद चे लाखो रुपये  वाचु लागले. अत्यानंद झाला. यामुळेच  ग्रामपं...

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

 पुण्यातील आमचा एक मित्र समाजसेवकच कॉलेजच्या जीवनात कोणीही रस्त्यावर दुचाकीवरून पडला तर धावतच मदतीला जाऊन रुग्णालयात पोहोचवण्यापर्यंत मदत पोलिसांनी हाक मारतात साथीदार म्हणून तेथेही मदत वसाहतीमध्ये वडिलांनी नोकरीवर असताना पारशी बाबा कडून विकत घेतलेला घर खरा शेजारील जागेत आई भाजीपाला पिकवत असे, वसाहतीत कोणीही आजारी पडले तर विनू भाऊला शोधायला मुला मुलींच्या सायकली घरी हमखास येत वसाहतीत कोणाचा मृत्यू झाला तर विनू भाऊ हातामध्ये बांबू आणि कोयता घेऊन त्या घरासमोर हजर झाला म्हणून समजा वसाहतीच्या कामासाठी नगरपालिकेत आपला हक्काचा माणूस असावा म्हणून सत्यनारायणाच्या पूजेला ठरवून टाकले. विनू आपला उमेदवार तो काळच असा होता की निवडणुकीला पैसे लागत नव्हते बऱ्यापैकी श्रीमंत असलेला माणूस पेंटरला बोलून रिकाम्या जागेवर फोटो सहित जाहिरात केली जायची एका मान्यता प्राप्त राजकीय पक्षांनी त्याला हेरला होता आणि आपल्या पक्षातर्फे निवडणुकीचा तिकीटही देऊन जाहीर केले विनू भरघोस मतांनी निवडणूक जिंकला आणि सर्वांचा लाडका विनू भाऊ नगरसेवक झाला. पुढे पक्षाने तरुण कार्यकर्ता म्हणून आमदारकीची ही उमेदवारी दिली वसाहतीतील...