Posts

Showing posts from April, 2024

आपले सर्वांचे बाबासाहेब

 नमन असो भारतीय संविधान व राज्यघटनेचे शिल्पकार भारताच्या स्वातंत्र्य पूर्वी रोजगार, श्रम, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व विमान वाहतूक मंत्री होते.  देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्याकडे कायदेमंत्री हे खाते सोपविले. पत्रकारितेच्या क्षेत्रात मूकनायक चे संपादक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ,  जलनितीतज्ञ, शोषण आणि अन्यायाला बळी पडलेल्या शेतकरी शेतमजूर, कामगार, बहुजन समाजाचे उद्धारक यामुळे आम्हा रायगडच्या शेतकऱ्यांना त्यांच्या वकिली क्षेत्रातील गाढा अभ्यासाचा फायदा झाला.व त्याचे उपकार कोणीच विसरू शकत नाहीत. आम्ही रायगडचे शेतकरी इतिहासाच्या नोंदीप्रमाणे आमचे पूर्वज आळंदी वरून रायगडला आले. विशेष करून समुद्रकिनारी राहून तेथील खोतांच्या, सावकारांच्या मालकीच्या शेतीचा विकास केला, मिठागरे, भात शेती करावयास अगदी उदरनिर्वाह पुरते धान्य मिळत असायचे आणि सावकारांची कोठारे भरलेली असायची. त्या काळात रायगडात 5 हजाराहून अधिक खोत, सावकार असल्याने सर्व जमिनी त्यांच्या आणि काम करणारे शेतकरी यांना न्याय मिळावा म्हणून अलिबाग तालुक्यातील त्या काळातील तडफदार सर्वांचे लाड...