आमची पद्मश्री 2024
ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांची २०२४ पद्मश्री रायगड पोलिसांनी घालविली आनंद झाला!माझ्या 25 वर्षाच्या अखंड समाजसेवेचे फलित म्हणजे देशाच्या सर्वोच्च पुरस्कारापैकी पद्मश्री साठी आपले लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जींनी सन 2024 साठी निवड केली होती. जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे चौकशी आणि जबाब अहवालासाठी पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून आले. येताच जिल्हाधिकारी रायगड कार्यालयाकडून अलिबाग पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालय यांनी घरी येऊन चौकशी केली. त्याचवेळी मी 100 कृषी सहाय्यक आणि 200 शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंजीनियरिंग कॉलेज मध्ये आपत्ती सुरक्षेचे धडे देत होतो. सायंकाळी 7 वाजता अलिबाग पोलीस ठाणे येथून फोन आला व तेथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. संजय बांगर यांनी चौकशी करून उद्या सकाळी 10वाजता पोलीस स्टेशनला या असे सांगितले. माझे गाव शहाबाज बाजूला पोयनाड पोलीस ठाणे, शेतीवाडी खानाव व बेलोशी येथे असल्याने रेवदंडा पोलीस ठाणे मी राहतो अलिबाग मध्ये म्हणून अलिबाग पोलीस ठाणे व दुसरे मांडवा पोलीस ठाणे येथे त्यांनी चौकशी क...