ज्येष्ठांची मनोगत

*🙏जीवन सुगंध*
आपल्या जीवन प्रवासात वेळ हा शब्द आपल्या सोबत मरणाची ती वेळ येईपर्यंत राहणार आहे, रहात आहे. मात्र त्याचा सदुपयोग केला तर कोणत्याही वयात आनंद घेता येतो. सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात असल्याने हजारो मित्र मैत्रिणी आहेत. आणि दिवसेंदिवस वाढत आहेतच. त्यातील अनेक जण सरकारी नोकरी. कारखान्यातून वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर,व्ही. आर. एस.  सेवानिवृत्त होऊन. आपल्या आवडीच्या घरी राहतात. त्यातील अनेक जण धनधान्य विपुल,सुखवस्तू , मुले, सुना नोकरी करीत असल्याने अनेक जण एकटे पडतात. आणी करायचे काय? असा अनेकांना प्रश्न पडतो. मुळात आपल्या लहानपणी काही गोष्टींची आवड असून सुद्धा सवड नसते तर आईवडिलांच्या आवडीने शिक्षण घेऊन नोकरी,उद्योग व्यवसाय केलेला असतो. आणि मनातल्या आवडी राहून गेलेल्या असतात.आपल्यात असलेले गुण ओळखा,आपणास  जीवनात आलेले अनुभव, नव्या पिढीला सांगा, लिहा, सध्याच्या काळात सोशल मीडिया मार्फत ते हजारों लोका पर्यंत पाठवा. मी एवढे वर्ष हे केले ते केले विसरा, मनात राहून गेलेला मार्ग बदला, आणि आनंद मिळवा. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. परिसरातील आश्रम, मंदिर, चर्च, मज्जिद, मध्ये जाऊन तेथे भेटणारे सर्व वयातील मित्रांना भेटा त्यांची, त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करा. कोणीही आपल्याला वेडा ठरविला, तरी त्याचा अजिबात विचार करू नका. शेवटी वेडी माणसेच इतिहास घडवितात.   Covid-19 च्या महामारीतून सरकारी सूचनांचे आपण तंतोतंत पालन करून, आपण हे दिवस पहात आहोत. आणि मनस्वी आनंद घेत आहोत. खरे तर या वयात आपल्यावर कौटुंबिक जबाबदारी तशी नसल्याने मनसोक्त आनंद लुटण्यासाठी,नियमित समुद्रकिनारा असेल तर, निसर्गाच्या सानिध्यात बागेत,नदी अथवा कालव्या शेजारी,  घरून सांगितलेले सामान, भाजीपाला, मच्छी, मटण आणण्याचे काम आनंदाने स्विकारून चालत आपला व्यायाम कसा होईल,हे अवश्य पहावे. तसेच मग लाईट बिल भरावयाचे असल्यास,किंवा सार्वजनिक वाचनालयात नियमित गेल्याने जुने व नवे मित्र मिळतात,  आपल्या विचारांना चालना मिळून सदा सर्वदा आनंद हमखास मिळतो. त्याचबरोबर आपला कायम. सवंगडी मोबाईल भाऊ आहेस ना मात्र त्याचा वापर गरजे पुरता करावा.अशाने या वयातही वेळ कसा आणि कधी जातो हे लक्षातही येत नाही. ज्यामुळे आपण कायम आनंदी राहता. तेव्हा आपले वय वाढत चालले आहे. याची जरासुद्धा तमा मनात बाळगू नये. मी कोणीतरी मोठा होतो आणि आहे. ही भावना मनातून क्षणभर काढून टाकून, मित्रानं सारखा आपणही सर्वसामान्य असून या देशाचा नागरिक असल्याने, ज्या समाजात मी वाढलो, राहिलो आणि रहात आहे. त्यामुळे माझी सामाजिक जबाबदारी असल्याने मी कायम दुसऱ्याला मदत करेल असे कार्य करा  आणि इतरांना त्याचा आदर्श दिसेल, असे आता प्रत्येक  ज्येष्ठांनी  करावयास हवे, केले पाहिजे. म्हणजे आपला आदर्श युवक-युवतींनी घेतला पाहिजे. असे माझ्या जेष्ठ मित्र-मैत्रिणींना सांगावेसे वाटते. मग या आमच्या सोबत देशसेवा करू या. =रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील. आपत्ती व्यवस्थापन तज्ञ.मो.९६७३७२७२७७

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.