✍️जीवन सुगंध!!!!!
मी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझरच्या नोकरीनिमित्त माझे गाव शहाबाज सोडून मी कुरूळ येथील निसर्गरम्य वसाहतीत रहावयास आलो. 30 वर्षांपूर्वीचे समुद्रकिनारी वसलेले अलिबाग गाव आपलेसे झाले. सुट्टीत सार्वजनिक वाचनालयात नियमित जाणे असल्याने एकदा रस्त्यात चक्कर येऊन आदिवासी* *बांधव पडलेला दिसला त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेल्याने त्याच्यासोबत मैत्री झाली,तो एक दिवस आड वररसोलीच्या तलावातून सुंदर ताजी कमळे, विकावयास आणत असे,त्या वेळेपासून आदिवासी समाजाला मदत करावयास हवी अशी प्रेरणा या लहान्यामुळे मिळाली. पुढे अलिबाग लायन्स क्लब चा सभासद. पदाधिकारी. ते 25 व्या वर्षाचा अध्यक्ष झाल्याने या समाजासाठी कायम आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, श्री* *सेवा मेडिकल ट्रस्टचा अध्यक्ष असल्याने 24 तास रुग्णवाहिका सेवेचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देणे, पोलीस ठाणे तहसील कार्यालयात, रेशन कार्ड बनवून देणे व विविध अडचणींना मदत हे कायम होत आले. त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, व्यसनमुक्तीसाठी शिबिरांचे आयोजन करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळेतील 25 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सुरक्षित जीवन जगण्यास तयार केले. जाऊ त्या वाडीवरील आदिवासी बांधवांना शिक्षणाची माहितीचे कायम प्रबोधन, रत्नागिरी टाईम चा* *जिल्हा संपादक असल्याने आदिवासी समाजासाठी आलेल्या योजनांची प्रसिद्धी आणि माहिती देणे. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील रामराज जवळील आदिवासी वाडीवरील बांधवांना,विहीर, कसेल त्याची जमीन यानुसार वनखात्याची प्रत्येक शेतकऱ्याला 7/12 मालकिचा तयार करून दिला. मी मालक व संपादक रायगडचा युवक चा असल्याने दरवर्षी माझा दिवाळी अंक प्रकाशित होत असे. सर्वसाधारणपणे दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर सिनेमा जगतातील सुंदर नट्यांचे छायाचित्र कायम असायचे. मी मात्र माझा आदिवासी समाजाचा कमळे विकणारा मित्र लहान्या याचे मी काढलेले छायाचित्र मुखपृष्ठावर छापले आणि रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या सांस्कृतिक संस्थेने जी राज्यभरातील* *मराठी भाषेचा विकास व्हावा म्हणूनदिवाळी अंकांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करते.त्याचा उत्कृष्ट रुपये 10 हजाराचे बक्षीस जाहीर झाले होते, दिवाळी अंक आणि रुपये 1000 मी लहान्यास दिल्यावर साधारण महिनाभर तो दिवाळी अंक अलिबागेत दाखवीत असे. त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आजही मला आठवण देतो. मी आदिवासी समाजाचा मित्र मागील 25 वर्ष करीत असलेल्या कार्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या* *आदिवासी विकास मंत्रालयाने सन 2019-20 चा आदिवासी सेवक पुरस्कार राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी रुपये 20 हजार, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र नाशिक येथे दिले. आणि आदिवासी बांधवांची सेवा करणाऱ्यास प्रेरणा देणाऱ्या आदिवासी मित्र लहान्याच्या आठवणीने जीवन सुगंध झाले-* *रायगड भुषण प्रा.जयपाल पाटील,अदिवासी सेवक,आपत्ती* *व्यवस्थापन तज्ञ,राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाज संस्था,(मुंबई,विभाग) संचालक, छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती, आपदा प्रशिक्षक कृषी मित्र,प्राणी मित्र(महाराष्ट्र शासन)*
Comments
Post a Comment