आपले सर्वांचे बाबासाहेब

 नमन असो
भारतीय संविधान व राज्यघटनेचे शिल्पकार भारताच्या स्वातंत्र्य पूर्वी रोजगार, श्रम, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व विमान वाहतूक मंत्री होते.  देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्याकडे कायदेमंत्री हे खाते सोपविले. पत्रकारितेच्या क्षेत्रात मूकनायक चे संपादक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ,  जलनितीतज्ञ, शोषण आणि अन्यायाला बळी पडलेल्या शेतकरी शेतमजूर, कामगार, बहुजन समाजाचे उद्धारक यामुळे आम्हा रायगडच्या शेतकऱ्यांना त्यांच्या वकिली क्षेत्रातील गाढा अभ्यासाचा फायदा झाला.व त्याचे उपकार कोणीच विसरू शकत नाहीत. आम्ही रायगडचे शेतकरी इतिहासाच्या नोंदीप्रमाणे आमचे पूर्वज आळंदी वरून रायगडला आले. विशेष करून समुद्रकिनारी राहून तेथील खोतांच्या, सावकारांच्या मालकीच्या शेतीचा विकास केला, मिठागरे, भात शेती करावयास अगदी उदरनिर्वाह पुरते धान्य मिळत असायचे आणि सावकारांची कोठारे भरलेली असायची. त्या काळात रायगडात 5 हजाराहून अधिक खोत, सावकार असल्याने सर्व जमिनी त्यांच्या आणि काम करणारे शेतकरी यांना न्याय मिळावा म्हणून अलिबाग तालुक्यातील त्या काळातील तडफदार सर्वांचे लाडके शेतकरी धेंरडचे स्वर्गीय नारायण नागू पाटील, पोलादपूरचे अनंत चित्रे, महाडचे सूरबा नाना टिपणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शेतकऱ्यांची या सावकारांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्याबाबत भेट घेतली होती.अलिबाग तालुक्यात सरी येथे सन1934  साली होणाऱ्या शेतकरी परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविण्यास 16 डिसेंबर 1934 ला मुंबई येथून समुद्र मार्गे रेवस बंदरात पोहोचले. त्या काळात 2000 शेतकरी सारळ येथे स्वागताला उपस्थित होते. चरी येथे झालेल्या शेतकरी परिषदेस 6000 शेतकरी उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे सर्व जाती-धर्माचे होते. आणि खोती पद्धत संपुष्टात यावी. व करणार्या शेतकऱ्यांना शेती मिळावी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 सप्टेंबर 1937 साली मुंबई विधानसभेत मागणी केली. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली10  हजार शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत काढला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्माचे कार्य करणारे महानायक होते. कोकणातील शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी लढा आजही आम्हाला शेतकरी म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणादायी आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतातल्या अठरापगड जाती धर्मातील जनतेचे आहेत. हे कोणीही विसरु नये. यांच्या जयंती सोबत शेतकरी आमचे अलिबाग धेंरडचे स्व. नारायण नागू पाटील, सुरबानाना टिपणीस महाड, अनंत चित्रे पोलादपूर यांनाही त्यांच्यासोबत नमन करतो.-समाज भुषण, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार,महाराष्ट्र शासन, अदिवासीसेवक, रायगडभूषण डॉ.जयपाल पाटील

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.