आमची पद्मश्री 2024
ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांची २०२४ पद्मश्री रायगड पोलिसांनी घालविली आनंद झाला!माझ्या 25 वर्षाच्या अखंड समाजसेवेचे फलित म्हणजे देशाच्या सर्वोच्च पुरस्कारापैकी पद्मश्री साठी आपले लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जींनी सन 2024 साठी निवड केली होती. जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे चौकशी आणि जबाब अहवालासाठी पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून आले. येताच जिल्हाधिकारी रायगड कार्यालयाकडून अलिबाग पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालय यांनी घरी येऊन चौकशी केली. त्याचवेळी मी 100 कृषी सहाय्यक आणि 200 शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंजीनियरिंग कॉलेज मध्ये आपत्ती सुरक्षेचे धडे देत होतो. सायंकाळी 7 वाजता अलिबाग पोलीस ठाणे येथून फोन आला व तेथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. संजय बांगर यांनी चौकशी करून उद्या सकाळी 10वाजता पोलीस स्टेशनला या असे सांगितले. माझे गाव शहाबाज बाजूला पोयनाड पोलीस ठाणे, शेतीवाडी खानाव व बेलोशी येथे असल्याने रेवदंडा पोलीस ठाणे मी राहतो अलिबाग मध्ये म्हणून अलिबाग पोलीस ठाणे व दुसरे मांडवा पोलीस ठाणे येथे त्यांनी चौकशी करून मला एका राजकीय लोकांनी खोट्या केसेस मध्ये गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये मला शिक्षा व दंड झाला होती त्याबाबत वरिष्ठ न्यायालयात मी अपील दाखल केले असता माझी निर्दोष मुक्तता झाली होती. ती केस माझे राजकीय गुरू एडवोकेट दत्ताजीराव खानविलकर यांनी चालविली होती. त्याची नोंद तेथील क्राईम रजिस्टर मध्ये केलेली नसल्याने गुन्हा असल्याची नोंद अलिबाग पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांनी मला न बोलावता माझा रिपोर्ट त्याच रात्री तहसीलदारांकडे पाठवून दिला आणि माझी पद्मश्री गेली.दरवर्षी पोलीस ठाण्याची तपासणी होते यामध्ये मांडवा पोलीस ठाण्याची दोन उपविभागीय पोलीसअधिकारी, एक जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तपासणीचे कार्य उरकले होते याबाबत माननीय अण्णा हजारे यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकारामुळे अनेक महिन्यांनी कागदपत्रे मिळाले याबाबत महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती अर्ज केला व आपल्या गृह खात्याची चूक झाली त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी माझी चौकशी जाबजबाब घेतला ज्यावेळी माझे पंतप्रधान कार्यालयाने पद्मश्री साठी निवड केली होती त्यावेळी माझ्यावर कोणताही गुन्हा देशभरात दाखल नव्हता म्हणून गृह खात्याने माझी 2025 पद्मश्री साठी शिफारस करावी अशी मी विनंती केली याबाबत आमचे येथील विधानपरिषद माजी आमदार श्री. जयंत पाटील यांनी महाराष्ट्र गृह खात्याच्या चुकी मुळे पद्मश्रीचा पुनर्विचार व्हावा म्हणून माननीय पंतप्रधान व माननीय राष्ट्रपती महोदयांना पत्र दिले. माझी अखंड समाजसेवा पाहून स्थानिक आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांनीही सन 2025 च्या पद्मश्री साठी पुन्हा शिफारस केली. आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक संस्था, पत्रकार, समाजसेवक या सर्वांचा मी आभारी आहे माझ्या अखंड समाजसेवेमध्ये महाराष्ट्र शासनाने आदिवासी व अल्पसंख्यांक दिव्यांग अविरत सेवे बाबत "आदिवासी सेवक" व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "समाज भूषण" पुरस्कार देऊन गौरविले आहे. मला रायगड पोलीस दलाने घाई गर्दी करून पद्मश्री सारख्या देशपातळीवरील पुरस्कारासाठी प्रत्यक्ष न बोलाविता चुकीचा रिपोर्ट पाठवून केंद्र शासनाचा सन्मानाचा पुरस्कार घालविला यासाठी आताचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांची भेट घेऊन माझ्यावर झालेल्या अन्यायाचं निराकरण होण्यासाठी प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांच्या मंत्रालयातील सहाय्यक कडे फोन द्वारे, पत्राद्वारे विनंती केली. माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला शासनाचा मान्यता प्राप्त ज्येष्ठ पत्रकार राला प्रत्यक्ष भेट देऊ शकले नाहीत याचा ज्येष्ठ नागरिक म्हणून दुःख होत आहे मात्र देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी समाजसेवक म्हणून मी केलेल्या कार्याची नोंद घेऊन 2024 पद्मश्री साठी माझी निवड केली होती. त्याबद्दल त्यांना त्रिवार धन्यवाद! मला मिळालेली पद्मश्री पोलिसांनी घालवली याचं दुःख मनस्वी असून आपणावर जर अशी पाळी आली असती तर आपणास काय वाटले असते, याचा आपण विचार करून पहा, असे घडून सुद्धा प्रथम देशसेवा ही भावना मनामध्ये असल्याने मित्रांनो माझी समाज सेवा अखंड सुरू आहे, कृपया आपली प्रतिक्रिया जरूर कळवा ज्यामुळे माझी निवड होऊन सुद्धा पद्मश्री गेल्याचे दुःख कमी होईल, आपल्या राज्याची मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते कसे कार्यकर्ते याचाही अनुभव जनतेने घ्यावा, येत्या 25 जानेवारीपर्यंत थांबून वकील मित्रांनी सल्ला दिल्यामुळे याविषयी न्यायालयात दाद मागणार, आजही जीवनाचे मार्गक्रमण करताना आनंदी आनंद आहेच. धन्यवाद!
Comments
Post a Comment