✍🏻आठवण बिबट्याची!
आमची शेती अलिबाग तालुक्यातील कुणे गावातील जंगला जवळ आहे तेथील आम्ही अनुभवलेला बिबट्याचा प्रसंग आपणास सांगत आहे अलिबाग जवळील वेशीवर वेश्वी येथील छपाई मशीन असलेला आमच्या मित्राच्या बहिणीचे लग्न अदोशी येथे झाले. त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने आम्ही त्यावेळी माझे शेतघर दांडेकर विहिरीच्या बाजूला होते. सध्या पनवेलला राहत असलेला आमच्या कुटुंबातील सर्वात लहान भाऊ जो आता वकील होऊन नोटरी म्हणून पनवेल येथे राहत आहे शेतावरच्या घरामध्ये तो माझी मोठी कन्या पल्लवी शेतगडी गजा काका व त्याची सौभाग्यवती होती मी माझा छोटा चिरंजीव सत्यम आणि सौभाग्यवती जयश्री आमच्या हिरो होंडा वर अंदोशी येथे गेलो होतो मित्र परिवारामुळे येताना उशीर झाला आणि सायंकाळचे सात वाजले होते काळोख पडायला सुरुवात झाली होती घराकडे जाताना रस्त्यामध्ये पाणथळ भाग होता तिथेच पाण्याचे टबके होते.चिखलाचा रस्ता असल्याने कसरत करतच मोटरसायकल न्यावी आणि आणावी लागत असे, आणि पुढच्याच वळणावर डबक्यामध्ये पाणी पीत असलेला बिबट्या सौभाग्यवतीला दिसला आणि तिने सांगितले गाडी थांबवा समोर बघा बिबट्यानेही आमच्याकडे पाहिल...
Comments
Post a Comment