आता नेहमी विचार करु या
माझे उत्पन्न, माझे घर, माझी कार, माझा व्यवसाय, माझी इतर मालमत्ता इ. हे सर्व सुरक्षित आहे, जोपर्यंत माझा देश सुरक्षित आहे. अन्यथा सर्वकाही आगीत जाईल. नामशेष होईल,आज २ दशलक्ष युक्रेनियन रशिया-युक्रेन युद्धात सर्व काही मागे टाकून इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत.शेजारच्या देशांनी त्यांना आश्रय दिला हे ते भाग्यवान होते.त्या सर्व देशांचे अभिनंदन! आमचे काय होणार???. आम्ही कुठे जाऊ असे तुम्हाला वाटते???एका बाजूला पाकिस्तान, एका बाजूला बांगलादेश, खाली हिंदी महासागर, वर चीन, देशाच्या आत काही ठिकाणी असंख्य गद्दार!!!,कोणाचे तरी ऐकून बॉम्बस्फोट करतात.आता आपल्या देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, गृहमंत्रालय, भारतीय सैन्याचे भुदल, नौदल, हवाईदल तिन्ही दल, बॉर्डर सेक्युरिटी, फोर्स,सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ईतर सुरक्षा दले आणी देशभरातील पोलीसदले सतर्क आहेतच, काळजी नको,न जाणो आपल्या देशावर चुकुन एखादी आपत्ती आली तरीसुद्धा लक्षात ठेवा की तुम्हाला आश्रय देण्यासाठी दुसरा कोणताही देश जवळ नाही.मदत करणारे देश दुर आहेत.आपले पंतप्रधान देशाची प्रगती करीत आहेत हे आपल्या शेजारच्या देशांना पाहावत नाही. तेव्हा आपण रहात असलेल्या परिसरात काही संशयास्पद गोष्टी, एस,टी.स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन,समुद्रकिनारी सामानाच्या बॅगा, समस्यास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्ती आपल्या नजरेस आल्या, तर, या देशाचा नागरिक म्हणून आपल्या साऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या परिचयाच्या पोलीस भाऊ अगर बहिणीला किंवा नजिकच्या पोलीस स्टेशनला, कृपया बेलाशक माहिती द्या.आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, एकदा तरी देशसेवेसाठी आपण हे काम जरूर करा,आणी सशक्त राष्ट्राला प्राधान्य द्या.पहा विचार करा=ज्येष्ठ पत्रकार डाँ. जयपाल पाटील,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, मो.९६७३७२७२७७
Comments
Post a Comment