✍️ओरिसात चक्रीवादळाने नुकसान कमी होऊ दे!
निसर्गाच्या कोपामुळे ओरिसा मध्ये दाना चक्रीवादळ समुद्र मार्गे जवळ येत असताना काय नुकसान होईल हे सांगता येत नसल्यामुळे तेथील जिल्हा प्रशासन मदतीसाठी सतर्क झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील ज्या गावांना जास्त धोका संभवतो तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे कार्य जोरात सुरू असून तेथील जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने केंद्र सरकारच्या गृह खात्याकडून आलेल्या आदेशाने तेथील समाजसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती मित्र व आपत्ती मैत्रिणी याचे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात दिले असून तेही प्रशासनास मदत करण्यास तत्पर झाले आहेत. हाच अनुभव रायगड जिल्ह्यात २ वेळा आलेल्या चक्रीवादळामुळे प्रत्येक तालुक्यात१५-२० आपत्ती मित्र -आपत्ती मैत्रीण यांना प्रशिक्षण दिलेले आहे. आम्ही रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे आदिवासी आश्रम शाळा,अनेक शाळा,महाविदयालयात, ग्रामपंचायतीत आम्ही प्रशिक्षण दिलेले आहेत. सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेले अनेक गावांना धोका निर्माण झाल्याचा अहवाल केंद्र सरकारने पाठवल्यामुळेच नुकताच भर पावसात आम्ही रायगडातील खालापूर तालुक्यातील १२ दरड ग्रस्त ग्रामपंचायतीत नागरिकांना धोकादायक गावांना तेथील नागरिकांना शासनाने दिलेल्या नवीन जागी स्थलांतर करावे अशा नोटीसा दिलेल्या असताना सुद्धा तेथील ग्रामस्थ ऐकत नाही म्हणूनच 12 दरडग्रस्त गावात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रबोधन केले, डोंगराच्या कडेला आणि नदीच्या बाजूला कोणीही घरे बांधू नयेत यासाठी गावात ग्रामसेवक व तलाठी,कोतवाल यांना जबाबदार धरावे, ज्यामुळे जीवित व पशु हानी, घराचे नुकसान होणार नाही अशी मागणी देशाचे पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख यांच्याकडे मागणी केली आहे. मागील काही वर्षात रायगडात फार मोठ्या आपत्ती येऊन जनतेचे व शासनाचे नुकसान झाले आहे.हे होऊ नये म्हणून रायगडचे माजी जिल्हाधिकारी श्री. महेंद्र कल्याणकर आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील या दोघांनी आमचे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचले असल्याने रायगड जिल्हातील 811 ग्रामपंचायतील नागरिकांना आपत्ती व सुरक्षा विषयक ज्ञान देण्याचे काम दिले आणि विशेष म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये ग्रामपंचायतीत नागरिकांना आपत्ती व सुरक्षा विषयक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद ठरणार आहे. महाराष्ट्रात निवडणूक असल्याने आचारसंहितेमुळे हे प्रशिक्षण सध्या थांबविले आहे. निवडणूक सपंताच पुन्हा ग्रामपंचायतीचे कार्य सुरू करून शाळा आणि कॉलेजमधील किमान 5000 विद्यार्थ्यांना आपत्ती मित्र आणि मैत्रीण म्हणून प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. आता ओरिसामध्ये चक्रीवादळात कार्य करणाऱ्या आमच्या प्रशिक्षित आपत्ती मित्र व मैत्रिणींना हिम्मत आणि ताकद मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि चक्रीवादळाने नुकसान कमी होऊ दे अशी आशा व्यक्त करतो-- प्रा. डॉ. जयपाल पाटील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ मो.९६७३७२७२७७
Comments
Post a Comment