✍️कायम लक्षात राहणारी दिवाळी!

 आमचे वडील रायगड पोलीस दलात शिपाई म्हणून खालापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. घरात आईसोबत बहीण आणि आम्ही दोन भावंड होतो. तेथील रायगड जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीच्या वर्गात मी शिक्षण घेत होतो. महाजनांच्या चाळीत आम्ही राहत होतो आम्ही पोलिसाची पोर म्हणून आमच्याकडे बघण्याचा शेजाऱ्यांचा दृष्टिकोन त्याही काळात एक वेगळा होता.  मात्र शाळेत आम्ही हुशार होतो, माझा वर्गमित्र प्रकाश जंगम चे घर समोरच होते त्याचे वडील टेलर काम करीत असत त्या काळातील तो सुखी कुटुंबातील होता.पुढे तो रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यात गोडाऊन, तपासणीस म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाला. आजही त्याच्या कुटुंबासहित सर्वांची भेट होते, आणि दिवाळीच्या वेळेची आठवण येऊन डोळ्यातून अश्रूधारा निघतात. सोबत अशोक मारवाडी याच्या वडिलांचे दुकान होते , दोन-चार मित्र जीवाचे होतोअजून आला नाही त्या काळात सणानिमित्त दोनशे रुपये पगारातील ॲडव्हान्स मिळत असे त्यामुळे आमच्याकडे दिवाळीचा फराळ झाला नाही म्हणून आईने सांगून ठेवले की कोणी विचारले तर फराळ उत्तम झालेला आहे असे सांगावे  सुट्टीमुळे आम्ही मित्र गावाशेजारील भाताच्या शेतात टटोर्या खाण्यासाठी जात असू मध्येच प्रकाश जंगम त्याच्या आईने बनवलेला दिवाळीचा फराळ आम्हा मित्रांना हनुमंताच्या मंदिरात घेऊन आला आम्ही तुटून पडलो त्याला विनंती केली एक करंजी आणि एक लाडू बहीण भावाला देऊ का रे? त्यांनी कागदात बांधून दिला आणि तो मी घरी घेऊन आलो आईला लपून बहीण आणि भावांना दिल्यावर तेही खुश झाले, त्यातला बेसनचा लाडू उत्तमच होता दुसऱ्या दिवशी जंगम च्या घरी गेल्यानंतर त्याच्या आईला म्हणालो काकू बेसनचा लाडू उत्तम केलात. पत्त्याने दिली आम्हाला दिवाळी मारुतीच्या मंदिरात घरातून चोरून आणलेली दिवाळी मित्रांना दिली म्हणून पक्याला आई बाबांनी बेदम झाडून ठोकला आणि तोंडावरची चव विरून गेली आणि कायमची दिवाळी लक्षात राहिली, मी पोलिसाचा पोर, पुढे पोलिसांनाच आपत्ती व्यवस्थापनाचे घडे देऊ लागलो, त्यांच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचा सल्लागार म्हणून मी काम पाहू लागलो, तीस वर्षाच्या अखंड समाजसेवेमुळे सन 2024 ला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माझी पद्मश्री साठी निवड केली आणि एका पोलीस निरीक्षकांनीच मला न विचारता माझा चुकीचा अहवाल पाठवून पद्मश्री घालवली हे नसे थोडके,आज आमची रोजच दिवाळी आहे आम्ही पोलिसांच्या पोरांनी जी अनुभवलेली दिवाळी कोणावर अशी पाळी येऊ नये असे वाटते आजचे पोलीस दल सुखी समाधानी आहे, आजही आमच्या काळातील मुलं मुली भेटतात, आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षणामुळे कशी प्रगती झाली याचे अनुभव मिळतात आणि जीवन आनंदमयी होतो.हे विचार  माझ्या डिझेल इंजिन या चरित्र ग्रंथातील आहे. आज दिवाळीची नरक चतुर्दशी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! आणि सुरक्षित जीवन राहो- डाँ.जयपाल पाटील

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.