✍️जीवन सुरक्षेचे तीन तेरा!

  महाराष्ट्रामध्ये हजारो व्यक्तींनी आपल्या स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना घेऊन आपल्या जीविताची काळजी घेतली आहे मुळात समाजातील मोठमोठे व्यवसायिक, निवृत्त सरकारी अधिकारी, आमच्यासारखे पत्रकार यांनी आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी शासनाकडे म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला. त्याबाबतची संपूर्ण  जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून चौकशी होऊन अर्ज केलेल्या व्यक्तीस  स्वरक्षणार्थ शस्त्र परवाना दिला जातो. त्यानंतर त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते शस्त्र भारतीय बनावटीचे अथवा परदेशी बनावटीचे घेतात त्यांना खरोखरच आपल्या जीवाची भीती असतेआणि त्यामध्ये राज्यात जेव्हा कधीही विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका येतात त्यावेळी दिल्ली येथून निवडणूक आयुक्तांचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पोहोचतात की ज्या लोकांकडे शस्त्रे आहेत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे जमा करावी असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोहोचतात आणि स्थानिक पोलिसांकडून शस्त्र जमा केली जातात मग त्यांच्या मौल्यवान जीवाचे काय हा प्रश्न निर्माण होतो. आमच्याकडे ही शस्त्र परवाना आहे मागील लोकसभेच्या वेळी पोलिसांनी सूचना केल्याप्रमाणे शस्त्र जमा करताना या आचारसंहितेमध्ये आमचे काही जीवाचे बरे वाईट झाले तर काही करोड रुपये जिल्हाधिकारी यांनी माझ्या सौभाग्यवतीला द्यावे लागतील असे पत्र दिले होते. मी जेव्हा दैनिक रत्नागिरी टाईम चा जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असताना संपूर्ण रायगड जिल्ह्यातून पेपरचे एजंट, वार्ताहर, प्रतिनिधी यांचेकडून दर तीन महिन्यांनी पैसे अलिबाग येथे आणावे लागत होते अशाच एका दिवशी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथून जमा केलेले पैसे घेऊन निघालो असता एक मोटरसायकल वरून दोन लोक माझा पाठलाग करत होते. गाडीत असल्याने सरळ  म्हसळा  पोलीस स्टेशन मध्ये घुसलो घामेघुम झाल्याने ठाणे अंमलदार ओळखीचे होते त्यांनी विचारलं काय झालं मग मी त्याला सांगितलं माझा पाठलाग करत दोन तरुण पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला उभे आहेत पहावे एक पोलीस पाहण्यासाठी गेला असता त्यांनी पलायन केले. थोड्यावेळाने एका पोलिसाच्या सोबत विश्रामगृहात गेलो. मग तेथील पत्रकार व एजंट आल्यानंतर थोडे बरे वाटले दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारीअसलेले कवी मित्र श्रीमान  दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली असता त्यांनाही घटना सांगताच तातडीने महिन्याभरात मला शस्त्र परवाना मंजूर करून दिला व मी  माझे शस्त्र अंबरनाथ  शासकीय कारखाना  मधून विकत घेतले असो. देशाच्या निवडणूक आयुक्तांचे हे नियम मनाला पटत नाही, शस्त्र परवाना धारकावर कधी किंवा आपत्ती येऊन जीव जाईल हे सांगता येत नाही, आणि या घटनेची या निवडणुकी दरम्यान आम्ही वाट पाहत आहोत, याविषयी न्यायालयात जाण्यासाठी आपणही मदत करू शकता, प्रथम याविषयी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांना विनंती पत्र पाठवीत  आहे.  महाराष्ट्रात चुकून अशी घटना जर घडली तर उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्याचा मानस आहे, यामध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे असलेली शस्त्र जमा केली तर काही हरकत नाही मात्र उद्योजक, पत्रकार, माजी सरकारी अधिकारी यांची शस्त्र जमा केली जाऊ नयेत असे आम्हास वाटते. यासाठी अधिकृत शस्त्र परवाना धारकावर हल्ला होऊन जखमी झाला अशी बातमी वृत्तपत्रात येतेच ती बातमी आणि फोटो समाजसेवक व पत्रकार यांनी  कृपया मला माझ्या या व्हाट्सअप क्रमांक9673727277 वर पाठवावा ही नम्र सर्वांना विनंती- डॉ. जयपाल पाटील ज्येष्ठ पत्रकार, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ,

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.