✍️औद्योगिक सुरक्षा दिन

आशिया खंडातील सर्वात मोठा फर्टीलायझर चा कारखाना अलिबाग तालुक्यातील थळ येथे माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रमुख्यमंत्री  बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्यामुळे आला आणि अलिबाग तालुक्याचे सर्व दृष्टीकोनातून कायापालट झाला सन 1979 साली मी सामान संकलक व वाहनचालक म्हणून कारखान्यात  कामाला लागलो. कारखान्याला लागणारे सामान ४चाकी पासून १० चाकी वाहने मुंबईतून थळ येथे आणण्याचे काम मला करावे लागे  म्हणून चेंबूर येथील कंपनीत सुरक्षाविषयक होणाऱ्या कार्यशाळेत मला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली, कारखान्याने थळ येथून पेंण पर्यंत रेल्वेचे रुळ टाकले, आणि २ रेल्वे इंजिन विकत घेतली. लोको ऑपरेटर म्हणून प्रशिक्षण घेण्याची नवी दिल्ली येथे रेल्वेच्या  सकुरबस्ती येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये शिक्षणाची संधी प्राप्त झाली. कारखान्याच्या कडून वसाहतीत गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्याची सचिव म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आली होती पुढे मी वेळेचा सदुपयोग म्हणून समाजकार्य व  पत्रकारिता  करू लागलो कारखान्याची प्रगती जोमाने होऊ लागली आणि मला कारखान्यात पहिला महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंडळातर्फे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाला, कविता लिहिण्याचा छंद असल्यामुळे लहान मुलांच्या कविता लिहू लागलो त्या आकाशवाणी रत्नागिरी वमुंबईवरुन  प्रसारित झाल्याने कामगार कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहित पडू लागलो. दिल्ली- मुंबई विमान प्रवासात श्रीमती रोझा देशपांडे यांचा परिचय झाला होता त्या माँस्को आकाशवाणी मध्ये कार्यरत होत्या. मी कामगार कवी म्हणून ओळख देता आणि माझ्या ६०बाल कविता त्यांनी           रशियन भाषेत करून  माँस्को आणि ताश्कंदआकाशवाणी वरून प्रसारित करून माझी रशियाचा कामगार अभ्यास दौऱ्यासाठी रशियन सरकारने निवड केली. महाराष्ट्र शासनाने पुढे नागरी संरक्षण दलाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केल्यानंतर मुंबई येथील होमगार्ड कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरक्षा विषयक व्याख्याने रायगड जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या अत्यारितील नामांकित जवळजवळ सर्वच कारखान्यांमध्ये माझी व्याख्याने झाली. यामध्ये प्रत्येक कामगारांनी आपण आपल्या कंपनीसाठी काम करतो ही भूमिका कायम ठेवून आपला सुरक्षेसाठी दिलेली सर्व साहित्याचा वापर कारखान्यात कामावर जातानां करावाच  असे ठासून सांगत आलो आहे.ऊदा,डोक्यावर हेल्मेट डोळ्यावर चष्मा पायात सेफ्टी शूज, जीवन अनमोल आहे त्याची काळजी आपल्यासाठी व कुटुंबासाठी घ्यायलाच पाहिजे म्हणजे कोणत्याच प्रकारची आपत्ती जीवनात येणार नाही.तमाम सर्व क्षेत्रातील माझ्या कामगार बंधूंना औद्योगिक  सुरक्षा  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!-डाँ.जयपाल पाटील,गुणवंत कामगार,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.