✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

 पुण्यातील आमचा एक मित्र समाजसेवकच कॉलेजच्या जीवनात कोणीही रस्त्यावर दुचाकीवरून पडला तर धावतच मदतीला जाऊन रुग्णालयात पोहोचवण्यापर्यंत मदत पोलिसांनी हाक मारतात साथीदार म्हणून तेथेही मदत वसाहतीमध्ये वडिलांनी नोकरीवर असताना पारशी बाबा कडून विकत घेतलेला घर खरा शेजारील जागेत आई भाजीपाला पिकवत असे, वसाहतीत कोणीही आजारी पडले तर विनू भाऊला शोधायला मुला मुलींच्या सायकली घरी हमखास येत वसाहतीत कोणाचा मृत्यू झाला तर विनू भाऊ हातामध्ये बांबू आणि कोयता घेऊन त्या घरासमोर हजर झाला म्हणून समजा वसाहतीच्या कामासाठी नगरपालिकेत आपला हक्काचा माणूस असावा म्हणून सत्यनारायणाच्या पूजेला ठरवून टाकले. विनू आपला उमेदवार तो काळच असा होता की निवडणुकीला पैसे लागत नव्हते बऱ्यापैकी श्रीमंत असलेला माणूस पेंटरला बोलून रिकाम्या जागेवर फोटो सहित जाहिरात केली जायची एका मान्यता प्राप्त राजकीय पक्षांनी त्याला हेरला होता आणि आपल्या पक्षातर्फे निवडणुकीचा तिकीटही देऊन जाहीर केले विनू भरघोस मतांनी निवडणूक जिंकला आणि सर्वांचा लाडका विनू भाऊ नगरसेवक झाला. पुढे पक्षाने तरुण कार्यकर्ता म्हणून आमदारकीची ही उमेदवारी दिली वसाहतीतील अनेक कारखान्यात नोकरीच असणारे त्याचे मित्रांनी बॅनर झेंडे उमेदवारीची फी वर्गणी काढून भरली आणि विनू भाऊ आमदारही झाले अभ्यासू होतकरू शिकलेला आमदार म्हणून पार्टीच्या नेते मंडळींनी त्याला राज्यमंत्री केला त्याचा सचिव आमच्या गावाकडचा असल्याने त्याच्या हळद आणि लग्नकार्यास येणार म्हणून मला फोनही केला हळदीला मी पुष्पगुच्छ घेऊन गेलो तर मंत्री भाऊ शेतामध्ये सादरीवर बसून माझीच वाट पाहत होते सचिव व त्याचे वडील मला पाहून आश्चर्यचकित झाले नवरदेवाला भेटीचे पाकीट दिले,आणि मंत्री महोदयांना पुष्पगुच्छ देऊन हळदीचे स्वादिष्ट भोजन आणि अरे, तुरे च्या गप्पागोष्टीने भेटीचा आनंद वेगळाच अनुभवला असा आमचा मित्र समाजसेवक आणि राज्याचा राज्यमंत्री विनोद भाऊ! तर दुसरा आमचा पत्रकारितेतला मित्र दगडू भाई मी दैनिक रत्नागिरी टाईम चा जिल्हाप्रमुख असल्याने परिचय झाला. त्याला तेथील वार्ताहर केले. गावापासून तालुक्याला त्याची दहशत तुमच्या घरासमोर पत्र्याच्या शेडचे पत्रकार म्हणून कार्यालय सोबत जमीन विक्री आणि बिल्डरचे फ्लॅट भाड्याने देतो हा व्यवसाय कार्यालयाबाहेर कॅरम चे बोर्ड ठेवलेले तेथे गावातील 10 ते 12 होणार मुलांचा कंपू त्यांच्या सिगरेट पासूनचा सर्व खर्च दगडू भाई करणार रविवार म्हटलं कार्यालयासमोर 15 ते 20 शर्टाची बटणे उडी ठेवून युवक जाणारी येणारी ज्येष्ठांची टिंगल टवाळी करण्यात पर असायची एके दिवशी गावाच्या टोकावर राहणारे जोशी कुटुंब दगडू भाईला भेटावयास आले त्यांची 25 एकर जमीन अगदी जंगलात लागून होती त्याचे कोणीतरी एक झोपडी उभी केली होती आणि कुटुंब राहत होतो जोशी काकांची दोन्ही मुले अमेरिकेत व्यवसाय उद्योगामुळे राहत होती म्हणून दगडू भाईला पैसे देऊन झोपडी काढावयाची होती आणि जागेला तारेचे कंपाउंड करायचे होते.दगडू भाई ची नियत बदल जागा मोजणीच्या नावाखाली वकील मित्रामार्फत जोशी व जोशी काकूंची सही बॉण्ड पेपर वर घेऊन जागेचे बक्षीस पत्र दगडू आईने आपल्या नावावर करून घेतले जागा स्वच्छ मोजणी तार कंपाऊंड यासाठी लागणारे सर्व पैसे जोशी काकांकडून घेतले दगडू भाऊ ने दुसऱ्याची पत्रकारिता म्हणजे आमची सोडून स्वतःचे साप्ताहिक पेपर सुरू केले आणि जोशी काकांच्या जागेतील पाच एकर जमीन निसर्गाच्या सानिध्यातील मुंबईच्या बिल्डरला डेव्हलप साठी देऊन टाक आणि दगडू भाई करोडपती झाला जेव्हा जोशी काकांना आपल्या जागेचे बांधकाम कोण करत आहे याची चौकशी करता दगडू भाई करतो हे समजले दोघेही नवरा बायको त्याला भेटायला रविवारी गेले असता कार्यालयाबाहेर बसलेले त्यांचे पिंटू नी त्या दोघांना हाकलले ते पोलिसांकडे गेले त्यांनी आपले म्हणणे त्यांना सांगितले पत्रकार असलेला संपादक दगडू भाई पोलिसांच्या परिचयाचे होते या जोशी काकांची ची मुले अमेरिकेत असतात त्यांना कधी काळी पैसे लागले तर मीच देत होतो अख्या गावाला माहिती आहे त्यामुळे त्यांनीच मला बक्षीस पत्र करून ही जागा दिली मी ती बिल्डरला डेव्हलपमेंटला दिली या सर्व घटनेमुळे जोशी काकांची दोन्ही मुले भारतात गावी आली मध्यंतरी बिल्डर सोबत दगडू भाई ची हाणामारी पर्यंत मजल गेली कारण बिल्डरने आमची दगड माती सिमेंट घेतले पाहिजे म्हणून. जोशी काकांची दोन्ही दगडू भाईला भेटण्यास केले असता दुसऱ्या दिवशी तालुक्यावरून रात्री बारा वाजता आपल्या आलिशान गाडीतून दगडू भाई येत असताना एका पुलावरून दगडू भाई ची स्विफ्ट गाडी पडली त्यामध्ये असलेले दगडू भाई चे 3 सहकारी होते तेही देवा घरी गेले, अपघात कशामुळे झाला हे कोणालाही कधीही कळलेच नाही. पोलिसांनी चौकशी केली असता, पत्नीने सांगितले की जोशी काका काकू व मुले यांच्यावर संशय नसून मुंबईच्या बिल्डरवर रोख त्यांनी दर्शविला आणि पोलीस तपासाला लागले. आपले करोडो रुपये ठेवून दगडू भाई अनंतात विलीन झाले. शवयात्रे साठी मला फोन आल्याने मी वेळेवर पोहोचलो कुटुंबीय आणि कॅरम खेळणारे तरुण एवढेच जण गावातील एकही माणूस हजर नव्हता. युवकांनो आपल्या जीवनात जनतेचा भाऊ होणे म्हणजे आनंदी जीवन आणि जनतेमध्ये भाई होणे म्हणजे मृत्यू कधी केव्हाही अटळ आहे , हे सांगता येत नाही. यासाठी सामाजिक बांधिलकी जपताना वरील दोघांपैकी आपल्याला कोण व्हायचे आपण आपल्या जीवनात काय करायचे हे ठरवा. - ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.