देशसेवेत सामील व्हा
✍🏻 निवृत्तीनंतर काय? विचार करणाऱ्यांसाठी,आपल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी कराच आनंद मिळुन देशसेवेत सामील व्हा.
मी राष्ट्रीय केमिकल आणी फर्टीलायझर लि.भारत सरकार चेंबूर येथील कारखान्यात काम करीत होतो. खेळाची आवड असल्याने त्या काळात आर.सी.एफ.चेंबूर च्या क्रिकेट टीम चा विकेट किपर होतो,माझा जोडीदार मित्र हा बलविदंरसिंग सिंधु होता. तो पुढे महाराष्ट्र संघात पोहोचला , खेळात एकदा बाॅलर गोलंदाजीच्या वेगवान फेकीने माझा डाव्या हाताचा अंगठा क्रॅक झाला आणी क्रिकेट कायमचे बंद झाले आणी थळ येथे आलो ,अंगामधे खेळाडु वृती असेल आणी मित्र परिवार उत्तम असल्यास संधी असतेच अलिबाग जेल समोर शासनाचे अथिँक कार्यालयात माझे मित्र श्री.प्रदिप पाटील हे अधिकारी असल्याने ते आणी त्याचे सहाय्यक बॅडमिंटन खेळत असत,आरसीएफ चे मी,माझे 2बंधु विश्वास, सतीश, रवींद्र लोंढे,विनय गोविलकर असे रोज एकत्र येऊन सराव करत होतो,थोडा महागडा खेळ पण तंदुरुस्त व आनंद देणारा बॅडमिंटन खेळाची आरसीएफचा संघ म्हणून पर्सनल अधिकारी श्री.एम.डी.पाटील यांनी मान्यता दिली.आणी आम्ही 5जणानी जिल्ह्यात पहिला,दुसरा क्रमांक मिळवून आमचे आणी कंपनीचे नाव लौकिक केले.जयपाल आणी रवींद्र लोंढे, विश्वास, सतीश, गोविलकर कोर्टात उतरले की विजय नेहमीच मिळवत गेलो,स्पधेॅत रसिक आणी कॉलेजची मुले मुलींची गर्दी पाहून प्रतिस्पर्ध्यावर तुटुन पडताना आनंद मिळायचा आणी जिंकून आल्यावर महाव्यवस्थापकाकडुन कौतुक आरसीएफने प्रत्त्येक खेळातील खेळाडुंना संधी,कौतुक केलेच या बद्दल चेअरमन श्री.दुलीपसिंह, आणी वरिष्ठ अधिकारी यांचे आभार,वेळेचा कायम सद ऊपयोग केल्याने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने पहिला गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित केले.मला पत्रकारीतेची संधी भाउ सिनकर यांनी दिली त्याला 40वर्ष पुर्ण झाली. खास करून तरुण, तरुणीनी आपल्या आवडीनुसार खेळात लक्ष ठेवावे आणी आपले नाव, आई-वडील, गावाचे नाव उज्वल करा,मी आरसीएफ मधुन सेवानिवृत्ती घेऊन सिव्हिल डिफेन्स बोरी-ऊरण चा जनसंपर्क अधिकारी होऊन, शिक्षण, प्रशिक्षण घेऊन जागतिक पातळीवर पोहचून लाखो नागरिकास आपत्तीव्यवस्थापन चे प्रशिक्षण देतो,आणी ही काळाची गरज आहे. आणी सेवानिवृत्त असाल तर आमच्या रायगड चा युवक फाउंडेशन सोबत याच आपले स्वागत आहे.मी जागतिक पातळीवर गेल्याने भारती विद्यापीठ पुणे येथून निमंत्रण आले आपलाही ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास हातभार लागावा.-प्रा.डॉ.जयपाल पाटील,,आपत्तीव्यवस्थापन तज्ञ मो.9673727277
Comments
Post a Comment