भांड्यांचा अहेर नको
✍🏻 हिन्दु धर्मिया मधे घरात मुला-मुलीचे लग्न कार्य म्हणजे आनंदाचे दिवस घरातील आबालवृद्धांना आवडीचे नवीन कपडे खरेदी,मुलीचे लग्न म्हटले आणी जावई आम्हास हुंडा नको फक्त मुलगी द्या असे म्हणुन साखर पुडयास जावयाला लोक लज्जे स्तव सोन्याची भेट मुलीच्या वडीलास द्यावी लागते.आणी लग्नाच्या वेळी सोन्या चांदीचे दागिने मुलीला आईवडील करतातच.आणी लग्नाचा हाॅल,जेवणाचा खर्च दोन्ही कडील मंडळी अर्धा करते मुलीची सासुबाई घर पाहण्यास आल्यावर सांगते आमच्या नातेवाईक यांचा मानपान साड्या, शर्ट,पॅन्ट पीस,फेटा किव्हा टोपी देऊन करावा.म्हणजे हुंडा न मागता खर्च आलाच.आता नातेवाईकांचा पसारा मोठा होता.महागडी लग्न पत्रिकेत खाली मोठी टिप असते भांड्याचा अहेर नको म्हणजेच पैसे पाकिटात दिले तरी चालतील हे ओघाने आलेच.बिचाऱ्या मुलीच्या वडीलास लाखो रुपयांचा खर्च त्याला एक प्रकारे मदतच.आता भांड्यांचा अहेर जुन्या काळात दुरुन विहीरीचे पाणी आणावयास लागत असे ते घरातील भांड्यात, टाकीत साठवून ठेवत असत.आता सरकारने घरातच नळाचे पाणी दिले आहे.त्यामुळे हंडे,टाकी यांची गरज कमी होउ लागली असुन तांबट व कारागीर यांच्या उद्योगांवर थोडी मंदी आली आहे.पुर्वी अहेरात तांब्याचे हंडे कळश्या मोठ्या प्रमाणात दिल्ये जात होते.त्या ऐवजी आता लग्नात भव्यदिव्य मंडप,नवरी व मैत्रीणीना मेहंदी, फुलांवर, छायाचित्रकार, व्हिडिओ चित्रीकरण, जेवणाचे कंत्राटदार यांचे चांगले दिवस आलेत. नवरी मुलगी आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून नवीन घरात पाहीजे त्या वस्तु मागुन घेते. शिक्षण आणी मोठ्या पगाराची नोकरी कोणीही चुक झाल्यावर कमीपणा कोणी घेत नाही यामुळेच सध्या आपल्यात घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागले आहे.लग्न म्हणजेच पती,पत्नी ही संसाराची दोन चाके असुन सदा आनंदी रहावे व आपल्या आईवडिलांनी आपणास कसे एकत्र राहून वाढविले याची कायम आठवण ठेवावी-प्रा.डॉ.जयपाल पाटील मो.9673727277
Comments
Post a Comment