सरदारजी की जय हो

नुकताच आपत्ती व्यवस्थापन व्याखाना निमित्ताने एका कॉलेजच्या श्रम शिबिरा साठी गावात गेलो होतो गावात प्रवेश ठिकाणी शिवरायाचा पुतळा आहे त्यांना नतमस्तक होऊन वेळ असल्याने सावलीत उभा राहिला समोरून 2 ते 5 मुलाचा घोळका येत होता आणि सरदाजी वर जोक्स करताना हशा पिकला होता त्यात एक  जण जोक घाणेरडा सांगू लागला माझा पेहराव साधा असल्याने मी मनात आलेल्या रागाने  त्यांना थांबविले अरे सरदारांना असे अपशब्द वापरू नये त्याचा आपल्या देशावर फार उपकार आहेत स्वातंत्र लढ्यात सिहाचा वाटा आहे मुले जवळ आली काका हे खरे आहे का?मी म्हणालो तुम्ही काय शिकता?एक जण बोलला कॉलेज  तुम्ही सांगा कसे ते?त्याचा अभ्यास पाहून आश्चर्य वाटले चला तुमच्याही मुलांना उपयोगी पडेल पहा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत 42 हजार सैनिक होते त्यात28 हजार शीख तर इतर 14 हजार होते.भारत देशा स्वतंत्र होण्यात4096 जण शाहिद झाले त्या मध्ये शीख 3282 जणांनी आणि इतर 814 जण होते.तर फाशीवर गेलेले एकूण 814 जण लटकलेले त्यातील शीख 773 जण  व इतर 41 जण होते.देश स्वतंत्रतते साठी 2846 जणांना उमरकैद झाली त्या मध्ये 2147 शीख होते तर इतर499 जण होते.आपण मागे इतिहासात जाउ या जालियनवाला बाग मध्ये 1300 जण शाहिद झाले त्यामध्ये शीख 799 जण तर इतर 501 जण झाले होते  मुलांनो देशाच्या योगदान मध्ये 79%दिले आहे म्हणून त्याची अशी चेष्टा करू नका कारण भारतीय सैन्य मघील शीख रेजिमेंट रांची-झारखंड येथे आपत्ती व्यवस्थापन चे प्रशिक्षण घेतले आहे आणि थोड्या वेळाने तुमच्या शिबीर मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून येणार आहे मुलांनो तुम्ही कॉलेजला आहात अभ्यास दांडगा करा तुम्हाला मोठे व्हायचे आहे  मुलांची पागा पाग झाली मी मात्र शिवाजी महाराजाना नमस्कार करून त्याचे तेज पहात होतो आजचे 295 वे व्याखान नेहमी प्रमाणे शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून च होणार होते न राहून मुलांच्या मनात सरदारांना चिडवण्या पेक्षा त्याचे देशा साठी चे महान कार्याची ओळख दिल्याचा आनंद मिळला अभिमान वाटतो सरदारजिचा,शीख समुदाय याचा सरदारजी की जय हो

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.