नाती विसरू नका!!!
नाती विसरू नका। रात्री 11.30 वाजता पोस्ट मास्तर याचा फोन आला माझे लैपटॉप वर लिखाण चालू होते .फोन घेतला ,सर आमचे एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत त्याना सकाळी पनवेल येथे रुग्णालयात नेणें आहे 108 रुग्णवाहिका सकाळी पाहिजे आहे.फोन कॉन्फरन्स वर होता मी सकाळी 10 वाजता रुग्णालयात पोहचतो असे सांगितले त्याच वेळी कोरोनाग्रस्त च्या श्रीमतीने पोष्ट मास्तर ला सांगितले, मला पैसे लागतील ,किती ?50 हजार वेळ अतिशय गँभीर होती आणि ते दोघे कर्मचारी पोस्ट मधेच कामाला असल्याने पोस्ट मास्तर म्हणाले काही काळजी करू नका पाठवतो खरे तर दोघेही कर्मचारी दूरच्या जिल्हा मधील कोणी नातेवाईक नाही, पोस्ट मास्तर यांनी पोस्ट मधील जबाबदार अधीकारी सोबत 50 हजार रुपये पाठविले आणि मीही वेळेवर पोहचले तेथे रुग्णवाहिकेत रुग्णालय कर्मचारी यांनी रुग्णास आणले मात्र त्याची ओषध व सामानाची पिशवी मात्र त्याच्या पत्नीने न ठेवता पोस्ट अधिकारी याला रुग्ण वाहीकेत ठेवण्यास सांगितली. आम्ही कोरोना योद्धा आहोत अतिशय मनाला दुःख झाले आणि विसरून गेलो नेमके आज त्याच पोस्ट मास्तराचा सेवा निवृत्त कार्यक्रम होता मी पाहुणा होतो,पोस्ट मास्तरांना विचारले काय म्हणतो तुमचा कोरोना कर्मचारी? म्हणाले उत्तम आहेत.50 हजार आठवणीने दिले का?ते म्हणाले पाहूया , बरे होउदे,माझ्या लक्षात आले आणि मी माझ्या भाषणात पोस्ट मास्टर कोरोना योद्धा कसे आहेत हे व पोस्ट मास्तर यांनी दिलेले 50 हजार कसे दिले हे कार्यक्रम मध्ये सांगितले आपण उसने घेतलेले आणि वेळ प्रसंगी केलेली लाख मोलाची मदत आणि कोरोना काळातली तातडीने परत केली पाहीजे होती कारण आज पोस्ट मास्टर निवृत्त होणार होते आणि विशेष म्हणजे दोन्ही कर्मचारी पोस्टाचा गलेलठ्ठ पगार घेणारे असेही करू शकतात याचे आश्चर्य वाटले आणि कोरोनात आपल्या पतीला झालेला कोरोना मूळे आपणास त्रास होऊ नये हे पहावयास मिळाले आणि माणुसकीची नातीही कशी विसरू शकतात हे अनुभवास मिळाले मित्रानो मदत करा वेळ कोणावर कधी येईल हे सांगता येत नाही आणि आज कोविड चे नियम पाळून सेवा निवृत्ती कार्यक्रम मध्ये पोस्ट मास्तर साठी संपुर्ण डिव्हिजन चे अधिकारी, कर्मचारी व मित्र परिवार मध्ये त्याची लोकप्रियता पहावयास मिळाली,अभिनंदन त्या पोस्ट मास्तरांचे-रायगड भूषण जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील
Comments
Post a Comment