आठवणीतील दिवाळी


आजच्या दिवशी सकाळी6 वाजता आईने झोपेतून उठविले तेव्हढ्यात बापूने म्हणजे वडिलांनी सांगितले बूट पोलिश कर पोलिसांना कुठलाही सण असला तरी जनतेच्या सेवे साठी जावेच लागते त्यानी युनिफार्म चढविला होता व माझे कडे पहात होते ते निघून जातात आईने गरम पाणी टाकले होते उटणे सोबत दिले होते आणि जवळचा शेत बांध वरून आणलेले चिरांठु घेतले तोपर्यंत बहीण -भाऊ उठले तो पर्यन्त मला चाळीतील 3 नंबर रम मधील पवार मावशी कडे एक पातेले घेऊन जाण्यास सांगितले पवार काका हे पोलादपूर चे आणि बापूचे सहकारी पवार मावशीने गव्हाचे पीठ दिले आम्ही तांदुळ भात-भाकरी खाणारे पुढे पवार काकांचा अपघाती मृत्यु झाला आमचा आधार तुटला मावशींना पोलीस अधीक्षक यांनी अलिबागला कार्यलयात नोकरी दिली त्याचे 3 भाऊ पोलीस दलात कार्यरत आहेत आजही मी पोलादपूरला गेलो तर  नतमस्तक होतो अशीही परोपकारी माणसे असतात अश्या आठवणी.आमची1 बहिण आणि 3 भाऊ अतिशय सुख समृध्द आहेत.कपाटातून आईने नवे असलेले जुनेच कपडे दिले,आणि रात्री केलेल्या फक्त शंकरपाळी फराळ दिली व सांगितले कोणी चाळीतल्यानि विचारले तर सांगायचे चकली,करंजी,लाडू खूप झाले,छोटे भाऊ बहीण बाहेर फटाके म्हणजे टिकल्या फोडाव्यास गेले ,मी मोठा असल्याने बापू दिवाळीचे समान काल आणणार होते ना? नाहिरे त्यांना ऍडव्हान्स मिळाला नाही त्या काळात दिवाळीला 200 रुपये मिळत असायचे ते पैसे अलिबाग मुख्य कार्यालयातुन आले  नव्हते.
दिवाळीच्या दिवशी आम्ही शाळेच्या पटांगणात मित्र एकत्र भेटायचो त्या मध्ये नंदू लोहार एम ए बीएड होऊन मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होऊन गावी शेती करतोय आजही फोनवर संपर्क ठेवलाय, कोण तो आनंद  आमचा खालापूरचा प्रकाश जंगम तो येताना पिशवीत त्याच्या आईने केलेली दिवाळी आणायचा मी जरा जास्तच हात मारायचो कारण त्याची आई सुगरण होती नंतर प्रकाश रायगड जिल्हा परिषद मध्ये स्टोअर किपर होता आता निवृत्त झाला,आजही त्या बाजूला गेलो तर वहिनी,सुनबाई आदर तिथ्य करतात आठवणीभाऊ बीजेच्या अगोदरच्या दिवशी बापूंच्या भल्या मोठ्या पिशव्या सामानाच्या हसत हसत आणल्या होत्या मी आणि बहीण मदत करू लागलो कारण उद्या मामा येणार  सायंकाळी मित्रात चर्चा झाली उद्या घरात 3 महिन्याने महागडे बोकडाच्या मटनावर ताव मारणार,आणि सकाळी मामा आले आम्ही सारे भावंडे आनंदी झालो खूप खाऊ ,आजींनी दिलेली दिवळीवर आम्ही तुटून पडलो आणि तृप्त झालो अशी आमच्या 50 वर्षपूवी पोलिसांच्या पोराची दिवाळी होती,आज परिश्रम, अभ्यासाच्या जोरावर हेही दिवस गेले सध्याचा काळात रोजची दिवाळी पण प्राथमिक शिक्षण काळात अनुभवलेली आठवणीतील दिवाळीची आठवण डोळयातून अश्रू अनावर होतात
(माझ्या "पोलिसाचा पोर" या जीवन प्रवासातील उतारा आहे)-रायगड भूषण जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील मो.9673727277*

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.