मन व्यवथापन
आपले अनमोल जीवन जगताना अनेकांची हळवी,आनंदी, कडक मनाचे अनुभव आपण घेत आलो आहोत.त्या मध्ये कधी नव्हे ती आपल्या जीवनात कोरोनारीच्या महामारीचाअनुभव आपण घेतले आहेत.सरकारी सूचनांचे काटेकोर पालन करून दुसऱ्याला मदत करण्याचे आमचेही मन आम्ही अनुभवले आहे.कालच मित्र भेटला त्यालाही कोरोनाला प्रसाद मिळाला होता त्याने सरकारी रुग्णालयाचा अनुभव घेतला,अगदी पहिल्या दिवसापासून त्याच्या मनाला उत्तम साथ देत होतो.काही होणार नाही डॉ कटराच्या सल्ल्यानुसार वाग आणि या भयंकर रोगावर त्याने मात केली 10 किलो वजन कमी झाले बरा होऊन महिना झाला तरी सायंकाळी समुद्र किनाऱ्यावर का?येत नाही तर म्हणतो मला भीती वाटते .मला माझे मन सांगते की त्या रुग्णालया समोरून जायचे नाही मन त्याचे घाबरू लागले पण अश्या मित्रांना आपण भेटून त्याच्या मनाची भीती घालविण्यासाठी वेगळी ऊर्जा देण्याचे काम केले पाहिजे. एक मित्र कोरोनाला घाबरून पुण्याला जातो असे सांगू लागला सर्व ठिकाणी कोरोनाची भीती वाटते म्हणून जागा बदलून कसे चालेल.सरकारी नियमांचे योग्य प्रकरे पालन केल्याने कोरोना तुमच्या जवळ फिरकला का? दिवस भरात काही कारणास्तव कुटुंबातील सदस्य, नोकर याच्यावर आपण उगीचच डाफरतो त्या मुळे अधिक मनस्ताप मूळे आपल्याला विविध रोग मैत्री मरण्यास येतात त्या साठी सदा आनंदी रहा,व्यायाम करा,वेळेवर चहा,नास्ता, भरपुर पाणी म्हणजे कुठलेही रोग आपणास श्यक्यतो जवळीक करणार नाहीत. रात्री झोपेच्या जागेवर पडताच मी दिवसभर ज्यांना त्रास दिला असेल त्यानीं मला माफ करावे असे आपल्या मनाना सांगून ज्याने तुम्हाला या भूतलावर पाठविले आहे त्याचे आभार मानून मन स्थिर करा,दिवस भरातातील चिंता असतील त्या मनाला सांगा, व हे ही दिवस जातील ही भूमिका ठेऊन मन शांत ठेवा झोप काही वेळेत लागेल . तुमचे कितीही वय वाढले असले तरी तुम्ही सदा तरुण आहात असे मनाला सांगुन पहा कश्या गुदगल्या होतात त्या अनुभवा, सदा सर्वदा कोणीही कितीही वाईट बोलला(असे काही मित्र-मैत्रिणी तोंडावर बोलणारे असतात)तरी मनाला अजिबात वाईट वाटून घेऊ नका ,ते आपले काही चुकत असेल असे मनाला पटवून घ्या. आणि तो विषय मनातुन काढून टाका आणि मन कायम प्रफुल्लित ठेऊन सदा आनंदी, प्रसन्न, हसतमुख,नीटनेटके राहून आपले जीवन व्यतीत करा.आठवणीने दिवस भरात दुसऱ्या बद्दल चांगले बोला आणि इतरांना त्याचे चांगले सांगा म्हणजे आपल्या मनाला आनंदी ठेवण्यास मदत होईल,मीच जगात अतिशय शहाणा आहे ही भूमिका सोडून मन अगदी लहान,तरुण ,आपल्या वयाचे आणि जेष्ठ चे ऐकून घेण्याची सवय मनाला लावून घेतली तर आपले जीवन सदाबहार फुलासारखे होईल आणि मन प्रफुल्लित राहील--रायगड भूषण जयपाल पाटील 【B】(मो,9673727277
Comments
Post a Comment