नातेसबंध!!!!!!!

*नाती जीवनात अतूट अशीच पूर्वीच्या काळात होती.त्यांना जपले जात होते. तेही आपल्या कुटुंबात एकमेका बद्दल आदर ओत प्रोत वहात असे,जेष्ठ आणि वरिष्ठ यांचा आदर राखला जात होता.यामध्ये बहीण-भावाचे नाते अतूट असायचे लग्न न झालेल्या बहिणीची गावात कोणी छेड काढली तर एकट्याने अथवा कुटुंबातील भाऊ व गल्लीतील मित्रांसोबत त्याची धुलाई झालीच म्हणून समजाआणि तेव्हा कळले आपल्या पूर्वजांनी रक्षाबंधन, भाऊबीज हे सण आपल्यात का?निर्माण केले.मात्र या नात्याला सुद्धा  सध्याच्या काळात दृष्ट लागली. परवा एका नातेवाईकच्या हळदी समारंभाला गेलो होतो.कोविड-19 मुले साधारण 30 ते 32  नातेवाईक उपस्थित होते.अंगणातील मांडवात घरातील कुटुंब सख्के असून देखील लांब लांब बसली होती शेजारी बसलेल्या एकास विचारलं काय चाललंय हल्ली घरामध्ये मी बऱ्याच वर्षानी गेलो असल्याने मी प्रश्न विचारला?माझे कडे पाहून म्हणाले 10 लाख रुपये गुंठा झाला आहेना. भावानी बहिणीला हिस्सा दिला नाही म्हणून हे असे.                    मित्रांनो वडिलांचे खूप पूर्वी निधनानंतर1 ते 2 असलेल्या बहिणींनी आपल्या भावासाठी हक्क सोडपत्र तलाठ्यांकडे देऊन आपल्या आई-वडिलांच्या जागेवरून हक्क सोडला तेव्हा जागेला किंमत नव्हती आता पर्यटन विकास झाला म्हणून 10 ते25 लाख रुपये गुंठा भाव झाल्याने बहीण तिचा पती,मुलेमुली आपला मामा थोडी शेती वाडी विकून बंगला,चार चाकी गाडी चालवताना पाहू लागले आपली आई व वडील साधे घर आणि सायकल अगदीच कर्ज काढून मोटरसायकल वर फिरत आहोत.तरी सुद्धा काही बहीण भाऊ आपले नाते सबंध टिकवून आहेत सुख वस्तू असलेल्या भगिनी कायद्याने जरी वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा दिला असला तरी आपला 1 किव्हा 2-3  भाऊ असले तर त्यांना समान हिस्सा पूर्ण मिळावा म्हणून भगिनी,तिचे पती,मुले मुली आपण हुन  आपला सर्व हिस्सा आपल्या भावांना देतांनाही दिसत आहेत आणि त्याचे नातेसबंध  पूर्वापार आनंदी, सुख दुःखात एकत्र येतांना दिसतात. या एकाच कारणामुळे अनेक बंधुराज आपल्या व्यसनापोटी देशोधडीला लागलेले अनेक गावांत आपणास पहावयास मिळतील. अनेक जण आपल्या ओळखी विसरल्या दुःखाच्या वेळी येण्याचे टाळू लागले.त्या मध्ये कोविड-19 मूळे तर अनेकांना नामी संधी आली अगदी कोरोनामूळे जवळच्या कुटुंब मध्ये मृत्यू झाला त्याचे शेवटचे क्रिया कर्म सरकारी किव्हा सामजिक कार्यकर्ते यांनी उरकले,असे नातेसबंध एकमेकांना पारखी झाली आहेत पैसा, जागा,संपत्ती मूळे आपले पणात दुरावा निर्माण झाला आहे आणि आनंद हिरावून गेलंय तेव्हा नातेसबंध कुटुंबियाशी चांगले जपा आणि सुंदर, हसत खेळत आयुष्य जगा*

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.