अलिबाग कराचा सलाम
*डॉ. विजय सुर्यवंशीना अलिबाग कराचा सलाम*🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐अलिबाग समुद्र किनारी आपण भारतीय सैन्य मध्ये अनेक युध्दात कामगिरी बजावली होती असा टि. के. सी.55हा 37 टन वजनाचा 28 मीटर लांब व 12मिटर रुंदीचा रणगाडा अलिबाग समुद्र किनारी आणीत आहोत असे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या वेळचे जिल्हा धिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले होते आणि आज अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ठरलेल्या जागेवर जातीने लक्ष घालून त्या ऐतिहासिक रणगाड्याला स्थापन केले. डॉ. विजय सूर्यवशी रायगड किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खूप अभिमान आणि आदर असणारे रायगड ची राजधानी अलिबाग येथे पर्यटन साठी वेगळे काहीतरी करायचे म्हणून अलिबागचे आकर्षण लहान मुलांना व्हावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे कायदेशीर बाबी पूर्ण करून हा ऐतिहासिक रणगाडा मिळविला व त्याची स्वछता,रक्षणासाठी अलिबाग नगरपालिकेने करावे त्या प्रमाणे आज घडले.रायगड आणि अलिबागचे नाव जगात प्रसिद्ध आहेच,अलिबागची जगप्रसिद्ध वेध शाळा,हिराकोट तलाव,आग्रे स्मारक, आर,सी,एफ(अभ्यास सहली,विद्यार्थी आणि शेतकरी) कुलाबा ,खांदेरी- उंदेरी,रेवदंडा किल्ला,शहरातील प्राचीन मंदीरे, कनकेशवर,सिद्धेश्वर,रामधरधरणे ,सोबत नागाव,आक्षी, रेवदंडा, वरसोली, थळ,किहीम,सासवणे, मांडवा,रेवसचे समुद्र किनारे गोकुळेश्वर,चौलची मंदिरे,कलावंतीण वाडे आणि अलिबागेतील सुंदर असा हिराकोट किल्ला (जेथे कारागृह आहे ,हे शहरा बाहेर गेले पाहिजे या आणि हिराकोट मुक्त झाला पाहिजे यासाठी अलिबाग करांनी जिल्हयाचे खासदार मा.सुनील तटकरे,रायगड च्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे,अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व विधान परिषद आमदार जयंत पाटील यांना अलिबाग करांनी हिराकोट मुक्त करण्याची विनंती करावयास हवी)सोबत हा रणगाडा पहावयास पर्यटकांची गर्दी होईल,यामुळे स्थानिक लोकांचे उद्योग धंदे,हॉटेल,कॉटेज, रिक्षा,वाहने,घोडे व् बैल गाडी यांचा व्यवसाय वाढेल यासाठी डॉ, विजय सुर्यवंशी याचे आभार व सलाम💐💐💐💐【B】--रायगड भूषण जयपाल पाटील(मो.9673727277
Comments
Post a Comment