आई-वडिलांचा संभाळ
आपल्याला समाजात वावरायला, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि सुंदर जीवन जगण्यासाठी संधी ज्या आई वडिलांचे उपकार आपले जन्मातही विसरता येणार नाहीत.ते वृद्ध झाल्यावर त्यांना सांभाळणे हे आपल्या संस्कृती नुसार आपली असते पण अनेक महाभाग नोकरी,व्यवसाय मध्ये मोठे झाल्यावर विसरतात तर काही वृद्धाश्रमात सोडून देतात.आणि शेवटी सरकारला कायदा करण्याची पाळी आली सध्या याबाबत सोशल मीडियावर एक सुंदर क्लिप फिरत आहे त्या मध्ये आळदीमध्ये एका रिक्षा मधून दोन भावांनी आई वडिलांना रस्त्यावर सोडले त्यांच्या सभाषणावरून तेथील काही समाजसेवकांनी त्यांना हटकले तेव्हा कळले की दोघेही त्याचीच मुले आहेत मात्र त्याचा उद्दामपणा पणा पाहता हृदय हेलवले शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असो.तर या विषयी मनाला चटका देणारी सोशल मीडियावर एक क्लिप पहावयास मिळते त्यात उच्च शिक्षण घेतलेला तरुण आपल्या पत्नीचे एकून मुलाला आजोबा प्रिय असतानाही तो वृद्धाश्रम मध्ये सोडण्यास जातो वडिलांचे स्वागत तेथील प्रत्येक जण करतो वडील सामान ठेवण्यास जातात तेव्हा तो तेथेच बसतो त्याच्या शेजारी एक गृहस्थ येतात त्याच्याशी बोलतात तर त्यानी सांगितले दर महिन्याच्या मुलाच्या वाढ दिवसी येऊन आम्हला त्याच्या पेन्शन मधून गोड जेवण देतात आणि हो त्यानी तो अनाथ मुलगा त्याना मूल नव्हते म्हणून येथूनच त्याला नेला होता तो फार मोठा अधिकारी झाला आहे आणि नातू तर अतिशय गोड आहे आणि मुलाचे डोळे उघडले सुंदर ,सुंदर शिकवण.आता महाराष्ट्र मधील लातूर जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या आई-वडिलांना वृधाश्रम मध्ये ठेवले असल्याचा तक्रारी आल्या होत्या यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल गोविंदराव केंद्रे आणि त्याचे सर्व सदस्य यांनी परिषदेचे 14 हजार कर्मचारी यांना जे कर्मचारी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतील त्याच्या पगाराचे 30 टक्के रक्कम आई-वडीलाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी मजुरी जनरल सभेत घेतली आहे आणि असा कुटुंब बाबत निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे .हा आवळा वेगळा निर्णय घेतला त्या बद्दल अध्यक्ष व सदस्य आणि विशेष करून कर्मचारी युनियन चे हार्दिक अभिनंदन असा निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषदेने घ्यावा जेणे करून लाखो कुटूंब एकत्र नांदतील
Comments
Post a Comment