नावात कायआहे।

नावात काय आहे, बरंच काही आहे.नुसते नाव सांगितले की कोणत्याही कार्यालयात गेलेल्याचे काम झटकन होते.त्या मधेच सामाजिक, शैक्षणिक, संस्थेच्या लेटर हेड वर एखाद्याचे सल्लागार म्हणून नाव असेल ते नाव सर्वश्रुत असल्याने संस्थेचे कामही अतिशय तातडीने होण्यास सुखकर असते म्हणूनच नावात काय आहे असे बोलले जाते. एखादी व्यक्ती समाज कार्यात, त्या विशिष्ट समाजात ,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यानी समाजाचे देणेकरी या नात्याने अनेक वर्षे घटवलेलीअसल्याने त्याची लोकप्रियता अतिशय चांगली असल्याने त्याने कधीही सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना त्रास दिला नसेल तर त्याचे नावही सरकारी यंत्रणेत महत्त्व पूर्ण असते त्याचे  नाव संस्थेच्या  लेटर हेडवर असणे महत्वाचे असते.समाज सेवे साठी एखादी संस्था स्थापन करणे तिचे अध्यक्ष पद मिरवणे हे पाहिजे तितके सोपे नसते आणि त्यामुळे  जलसी वृत्ती व स्पर्धा मूळे त्रासही सहन करावा लागतो. अधिकारी मंडळी अभ्यासाने अतिशय हुशार असतात त्यातील काही जण नियमावर  बोट ठेवतात यासाठी समाजात राहून अनेक वर्ष उत्तम सेवा दिली, केलीतरच नावाला महत्व प्राप्त होते.हे अनेकांना अजून माहीत नाही. एखाद्याचे नाव घेतले तर त्या वक्तीची माहिती नसताना टिप्पणी करणे हा समाजात सध्या जोरदार उद्दोग सुरू आहे .स्वताला इतिहास -भूगोल माहीत नसताना आपला मोठेपणा करण्यात गुंग अनेकजण असतात.आपले नाव सांगितल्या वर त्याच्या चेहऱ्यावरील भावआणि मिळणारे सहकार्य यामध्येच आपल्या नावाची किमया किती थोर आहे याचा अनुभव कोणी बोलल्या शिवाय अनेकदा मिळतो यालाच नावात काय आहे हे आपल्याला अनुभवला मिळते.
आपल्या नावाला उगीचच महत्व प्राप्त होत नाही यासाठी दाडगा अभ्यास, तोंडात साखर व डोक्यावर बर्फाची लादी आणि आयुष्यातील अनेक वर्षे ,दिवस समाजा प्रति सेवेत दिली की आपले नाव दूरवर जाण्यास कोणतीही अडचण येत नाहीच आपण समाजाप्रती करीत असलेल्या कामांची नोंद सर्वत्र ठेवली जाते आणि आपला आदर्श इतरांनी घ्यावा म्हणून सरकार,विविध संस्था आपला सन्मान करतात,पुरस्कार देतात आणि आपल्या नावाला वेगळे महत्व प्राप्त होते आपण समाजाप्रती करीत असलेल्या कामांमुळेच मित्र -मैत्रिणीचा गोतावळा आपल्या भोवती एकत्र होऊ लागतो आणि आपणाला कळू लागले आपल्या नावात काय आहे. सध्याच्या काळात जनता अतिशय हुशार आहे.आपली इथंबूत माहिती प्रत्येक जण ठेवत असतो तो त्याचा अभ्यास आहे पण आपण परिश्रमाने आपले नाव कमावू शकता आणि आपल्या नावाची जादू चांगली नाव न सांगता अनुभवू शकता नशिबाने आपण या समाज्यात वावरत आहात तेव्हा प्रत्येका सोबत चांगलेच वागा,सदा चेहऱ्यावर हास्य ठेवा,दुसऱ्याचे चांगले होईल व सर्वजण सुरक्षित राहतील असे वागणे ठेवा आणि दुसऱ्याचे कौतुक करा .तेव्हा नावात काय आहे बरच काही आहे 

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.