आपत्ती व्यवस्थापन, आठवण


आठवण आजच्या दिवसाची साप्ताहिक रायगडचा युवक आणि  मर्शियल आर्ट कराटे ट्रेनिंग,अध्यक्ष दर्शन प्रभूच्या                सहयोगाने सिव्हिल डिफेन्स उरण-रायगड तर्फे पहिले 3 दिवसीय शिबिर दिनांक 26/12/2014 ला अलिबागेत घेतले आणि आज लाखो जनते पर्यन्त पोहोचले आहे,देश भरात येत असलेल्या आपत्ती मूळे राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण तर्फे पंतप्रधान कार्यलय तर्फे10 पाइंट नुसार देश भरतील आपत्ती व्यवस्थापन तज्ञा कडून स्वयंसेवक तयार  करण्याची   योजना आहे,त्याची केंद्रीय गृह खात्याने इयत्ता 8 वी ते 12वी च्या विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन चे प्रशिक्षण साठी जिल्हा पोलिस दल तर्फे शिक्षक तयार करण्यासाठी पहिले शिबीर घेतले त्यांचा मी प्रशिक्षक म्हणून सुरवात केली आणि कोविड-19 ची लाट आली. आता केंद्र सरकार च्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे तर्फे त्या साठी माझ्या सहीत देश भरातील अनेक तज्ञाना प्रशिक्षण ऑन लाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे,त्या मध्ये मी निमंत्रित आहे,  मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन विषयी अभ्यास व प्रशिक्षण दिल्याने रायगड जिल्हा परिषद ने "रायगड भूषण" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले "तर माझी 2017 ला 4थ्या जागतिक आपत्ती परिषदेत निवड होऊन " दोन चाकी वाहन अपघात"या लेखची निवड झाली होतो, तर पुन्हा 5 व्या जागतिक आपत्ती परिषदेत निवड होऊन "कोविड नंतर काय"या लेखाची निवड करण्यात आली व ती परीषद कोविड मुळे पुढील वर्षी होणार आहे,हाविषयशाळा,महाविद्यालयात , आश्रम शाळा मध्ये शिकवत असताना प्राथमिक शाळेत  शिकविले पाहिजे असे जेव्हा आमच्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आताच्या महाराष्ट्र राज्य मंत्री महोदया अदिती तटकरे व विरोधीपक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या 96 हजार विद्यार्थी व 6200 शिक्षकयांनाप्रशिक्षण, रायगडचे माजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी,रायगड जिल्हा आपत्ती प्राधिकरण च्या सह योगाने देण्या साठी मंजुरी दिली आहे त्या बद्दल यांचा आभारी आहेआणि राज्यात रायगड  जिल्हा परिषद आपत्ती व सुरक्षित चे धडे घेणारी होणार याचा मनापासून आनंद होतो, म्हणून या दिवसाचे माझे जीवनात महत्त्व आहे. जे सिव्हिल डिफेन्स चे मंगसुले सर,मुबई,आनंद शिंदेसर मुबंई,कोरी प्रिन्सिपल मॅडम होमगार्ड कोलेज व तेथील शिक्षकमुंबई, लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीकांत देसाईसर रांची झारखंड , डॉ, सिध्र्दार्थ पाटील, भाषा तज्ञ सुनीलप्रधान ,डॉ,राजेश्वरी,डॉ,जी .टी .पाटील,डॉ. अजित गवळी,माझी पत्नी जयश्री माझा मुलगा सत्यम,मुलगीपल्लवी,जावई प्रसाद वैद्य,रोहिणी वैद्य,रायगडचा युवक चे आपत्ती व सुरक्षा मित्र,राज्य भरातील महाराष्ट्र पोलीस,राज्यभरातील 108 रुग्णवाहिकेचे सर्व अधिकारी,पायलट ,महाराष्ट्र तील सर्व पत्रकार यांचा मी आभारी आहे तसेच वर्षे भर कोविड आणि चक्रीवादळ मध्ये मी आणि माझे आपत्ती मित्र यांनी केलेल्या सेवेबद्दल कोरोना योद्धा म्हणून सन्मान केलेल्या सर्व राज्य भरतील 6 संघटनांचा आभारी आहे  कोविड काळात प्राणी मात्राची ची सेवा करताना अनेक मित्र ,संघटननी मदत केली ते सर्व फोऊडेशनच्या "आपत्ती मित्र पुरस्कार" वितरण कार्यक्रम व अंकात प्रकाशित करू ,त्या मध्ये नावे जाहीर करू त्याचेही आभार ,आपणही कोणत्याही आपत्ती वेळी मदत करून प्रशासनास मदत करा ,तेव्हा  करू या देश सेवा!!!!--- रायगड भूषण जयपाल पाटील,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.