जीवन सुगंध
देशभरात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहयोगाने देशभरात पाच जागतिक आपत्ती परिषदांचे आयोजन करणारी आमची आंतरराष्ट्रीय दर्जाची डिझास्टर मॅनेजमेंट ,इनिसिटिव्ह एवं कन्व्हर्जेस सोसायटी(DMICS)हैदराबाद ,संस्थेमुळे देशभरातील व जगातील नामवंत आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण व प्रशिक्षण देणारे अनेकजण यामध्ये सहभागी आहेत. येत्या 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर मध्ये देवभूमी, डेहराडून उत्तरांचल येथे 6 वी जागतिक आपत्ती परिषद होणार आहे. याच्या आयोजनाची दिनांक व माहितीपत्राचे प्रकाशन उचलांचलचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवासस्थानी छोट्याशा कार्यक्रमात संपन्न झाले,आयोजकांतर्फे देशभरातील अध्यक्ष डॉ. आनंद बाबू सहित 11 सदस्य आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञ यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना सांगितले की आमच्या राज्यातील नद्यामुळे पावसाळ्यात व उन्हाळ्यातही अनेक वेळा पूर येऊन आपले मार्ग बदलतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्याचे अतोनात नुकसान होते. सोबत मोठ मोठ्या आपत्या ही येतात, आपण हे सर्व दूरदर्शनच्या माध्यमाने पाहतही असाल यासाठी काहीतरी उपाय सुचवा आपण सर्वजण या विषयातील तज्ञ व असून आपल्या मित्र परिवारांना सुद्धा सांगा. त्यांना आमचे सरकार रोख बक्षीस व मानसन्मान ही करेल.आपल्या सूचना आमच्या राज्याचे अप्पर सचिव डॉ. श्री. विजयकुमार जोगदंडे, आपत्ती प्राधिकरण उत्तरांचल सरकार, देहराडून यांना पाठवावेत. मित्रांनो आपल्या चांगल्या सूचनांमुळे उत्तरांचल राज्याचे व देशाचे आर्थिक व जीवित होणारे नुकसान थांबवण्यास मदत होईल मग विचार करताय ना!=रायगड भुषण जयपाल पाटील, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम आणि अभिसरण सोसायटी (डीएमआयसीएस) चे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक ६ वी परीषद, काँग्रेसचे समन्वयक (WCDM), माजी जनसंपर्क अधिकारी नागरी संरक्षण दल रायगड,सदस्य, रायगड जिल्हाधिकारी आपत्ती प्रतिसाद दल.मो.९६७३७२७२७७
Comments
Post a Comment