वेळेचेयोग्य नियोजन करा

                                                                       कार्यास वेळ अपुरा पडेल.राष्ट्रीय केमिकल आणि फटीलायझर्स लि. कारखान्या मध्ये दररोज पेण पर्यन्त युरिया खताचा भरलेल्या आणि लिक्विड अमोनिया वॅगन आणणे आणि नेणे हे काम. सुट्टीला आणि कामावरून आलोकी समाजसेवा,अशी 23 वर्षे  नोकरी केली. कामाच्या वेळी काम त्या मुळे  महाराष्ट्र शासनाचा कंपनीत पहिला गुणवन्त कामगार पुरस्कार मिळाला.आता माझेच पहाना पत्रकारिता महत्वाची, समाजाला उपयोगी असेल तेव्हा लेखणी हातात घेतो,आणि आपत्ती व्यवस्थापन मध्ये झोकून दिले नुसते नाही, त्यासाठी सिव्हिल डिफेन्स चे बोरी उरण,होमगार्ड कॉलेज मुबंई,यशदा पुणे,भारतीय सैन्य शीख रेजिमेंट रांची, झारखंड आणि 4वथ्या व 5व्या जागतिक आपत्ती मध्ये प्रशिक्षण, अभ्यास, परिश्रम,करुन पोहचलो. आणी लाखो लोकांना आपत्ती आली तर सामोरे कसे जायचे हे शिकविले, निवृत्त झालो,करायचे काय, व्याखान साठी 2 महिने तारखा बुक होतात यासाठी आपण माझे फेसबुक अथवा युट्यूब चॅनेल "रायगडचा युवक" पाऊन खात्री करू शकता,आणि हो वय आपले आड येत नाही फ़क्त मानसिकता हवी माझे सोबत रायगडचा युवक मध्ये या,सध्या आपत्ती व सुरक्षा मित्र म्हणून तरुण तरुणीचा  संच केला आहे,तूम्ही ही सोबत येऊ शकता,केंद्रीय गृह खात्याने देशभरात येणाऱ्या आपत्तीनां सामोरे कसे जायचे यासाठी इयत्ता 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण द्यावे म्हणून रायगड जिल्हा पोलीस दलाने या विषयावर बोलणारे शिक्षक घडविण्यासाठी रायगड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी शिबीर घेतले. त्या मध्ये रायगडातील 25 अधिकारी यांना शिक्षण देणारा मी पहिला आपत्ती व्यवस्थापन तज्ञ आहे. पहा वेळ पुरणार नाही,माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रम साठी  निवृत्त ऍडमिरल एल. रामदास, ब्रिगेडियर हेमंत महाजन, लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीकांत देसाई, डॉक्टर सिद्धार्थ पाटील, डॉक्टर जे. टी. पाटील, डॉक्टर अजीत गवळी, मेजर अरविंद रानडे एडवोकेट डॉक्टर रेश्मा पाटील,एडवोकेट सचिन जोशी यांचे सुयोग्य मार्गदर्शन मित्र सुनिल प्रधान, सुहास गानू हा योगा ,पत्रकार शुभाष म्हात्रे,प्रदीप पाटील फायर अधिकारी नितीन वागळे, श्रीपाद लेले, संदीप ढापरे,  हॅम रेडिओ बापट, सत्यम पाटील आणि सौ. जयश्री पाटील,पल्लवी प्रसाद वैद्य, विजया कुडव,सुरेश खडपे,विकास रणपिसे, मिलिंद पाटील,महाराष्ट्र पोलीस, 108 रुग्णवाहिका,102 रुग्णवाहिका,वनखाते,महसुल खाते,आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे सहकार्य अशे अनेक जण सहकारी आहेत. समाजात अभ्यासु असतात त्याना संधी दिली जात नाही किव्हा मिळत नाही किव्हा मला जमेल कसे? असे अनेकांना वाटत असते. प्रयत्न केले तर काही अवघड नसते, मित्रांनो डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली की सारे श्यक्य आहे.आणि कायम ध्येय समोर पाहिजे,आम्ही प्रथम देश नंतर माझे गाव, कुटुंब आणि मी ही भूमिका ठेवली तर आदरणीय डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड चा युवक प्रकाशन प्रसंगी सांगितले होते,जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही,करीत रहा,आज मला सामाजिक क्षेत्रातील समाज प्रबोधनकार म्हटले जाते. आतापर्यंत देशभरात 517 प्रत्यक्ष व्याख्याने सोबत आकाशवाणी मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथून लाखो नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन चे धडे दिले याचा मला अभिमान आहे, जीवनात वेळेचा सदुपयोग करा,आपल्या निवृत्ती नंतरचा वेळ सार्थकी लावा पहा किती आनंद होतो,या अफाट कार्यामुळे  छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी नुकताच मला डॉक्टरेट पदवी बहाल केली. आता रायगड जिल्हा परिषदेच्या ८०४ ग्रामपंचायत मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रम करावयाचे आहेत आणि हे सर्व आपल्या सहकार्य मुळेच तर 1000 व्याख्याने करून ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मानस आहे.=  रायगड भुषण प्रा.,डॉ.जयपाल पाटील ,राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाज संस्था, संचालक, छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती, माजी जनसंपर्क अधिकारी नागरी संरक्षण दल रायगड व सदस्य, रायगड जिल्हाधिकारी आपत्ती प्रतिसाद दल, मो.९६७३७२७२७७*

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.