✍️आता आमचं ठरलंय!
कोकण पदवीधर मतदार संघासाठी आम्ही उमेदवारी करावी म्हणून प्रथम सांगणारे ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक, रविद्र बेडकिहाळ,ज्येष्ठ पत्रकार, रायगड भूषण बळवंत वालेकर, तरुण तडफदार माझा पत्रकारितेतील शिष्य रायगडातील लोकप्रिय दैनिकात उपसंपादक असलेला सुयोग आंग्रे रायगडातील प्रसिद्ध एन.के.जी. को-ऑपरेटिव्ह बँकेचा अभ्यासू व्यवस्थापक श्री.आषिश म्हात्रे व त्याचे सहकारी कर्मचारी झावरे कायद्याचे ज्ञान असलेले अँड.मानस कुंटे,अँड.नेहा कुनुमल, सामाजिक कार्यकर्ते सौ.मिली पाटील, सौ.स्नेहल भगत,सौ.स्मिता कुंटे,असे माझ्या विचारांशी सहमत असले 15 जणांनी सुचक फार्म चिरंजीवाकडे दिले. त्यापैकी 10जणांचे घेतले यामधे माझे मित्र अँड.वैभव भोळे आहेत.दर 6 वर्षानी पुन्हा नोंदणी करावी लागते ही आपत्ती आहे.निवडणूक आयोग यांनी जिवंत असे पर्यंत कार्ड देणे,सुक्षिशित बेरोजगार यांना महिना 3000/-रुपये भत्ता देणे,शासन कार्यालयात रिक्त जागा लवकर भरणे,गाव व शहरां शेजारील कारखान्यात रोजगार देणे.या मागण्या साठी अर्ज दाखल केला व मंजुर झाला.एक नंबर मागणीमुळे कोकणातील अनेक पदवीधर ईच्छा असुन वंचित राहिले आहेत.ह्या निवडणूकी साठी अलिबाग तहसीलदार,श्री.विक्रम पाटील, नायब तहसीलदार,श्री.अजित टोळकर त्याच्या कार्यालयातील निवडणूक शाखेतील कर्मचारी,कोकण आयुक्त कार्यालय मधील नायब तहसीलदार सुहास सावंत यांचे आभार. तर आता संधी द्या, आपले पालघर, ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी नोंदणीकृत पदवीधर मतदार मित्र-मैत्रीण यांना माझ्या आवाहनाची चौकट पाठवा.-डॉ.जयपाल पाटील मो.9673727277
Comments
Post a Comment