✒️मी गुणवंत कामगार!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर थळ येथे 1979 ला  मटेरियल कलेक्टर कमवाहन चालक म्हणून नोकरीस लागलो. कारखान्यासाठी लागणारे साहित्य मुंबई, ठाणे, पुणे येथून आणावयाचे काम माझे होते. कारखान्याला लागणारी चार ते 26 चाकी वाहने सुद्धा आणली, पेण ते थळ  रेल्वे लाईन कारखान्याची सुरू झाली. मध्य रेल्वे कडून 2 इंजिन खरेदी करण्यात आली. जीवनात शिकत राहायचे ही भावना असल्याने माझी जनरल मॅनेजर यांनी रेल्वे इंजिन पायलट म्हणून नियुक्ती केली.  प्रशिक्षणासाठी मी, माझी पत्नी जयश्री,  माझी कन्या बाळ पल्लवीला घेऊन शकूरबस्ती, दिल्ली येथे प्रशिक्षणास गेलो, आमची तिघांची पहाडगंज नवी दिल्ली येथे एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती. आणि तेथे मला रेल्वे इंजिन चालविण्याचे अधिकृत परवाना मिळाला. त्यावेळी मी पानिपत, मसूरी, हरिद्वार,ऋषिकेश येथे शनिवार रविवार पाहण्याचा आनंद घेतला. जाताना राजधानी एक्सप्रेस येताना विमान प्रवास आयुष्यात प्रथम अनुभवला.  आम्ही आर.सी.एफ. थळ  मध्ये सुरुवातीला 19 जण होतो, नंतर वाढ होऊ लागली येथे 23 वर्ष नोकरी करून व्ही.आर.एस. घेऊन समाजसेवा करू लागलो.छायाचित्रण वाचनाची लेखनाचीआवड म्हणून  माझे पत्रकारितेतील गुरु कैलासवासी भाऊ शिनकर यांनी मला वार्ताहर केला कारखान्यात होणारे कार्यक्रमाचे छायाचित्र व जमेल तशी बातमी करू लागलो आणि पत्रकार झालो अलिबाग लायन्स क्लब चा सदस्य सचिव उपाध्यक्ष आणि पंचविसाव्या वर्षीचा अध्यक्ष झालो महाराष्ट्र शासनाने आरसीएफ मध्ये पहिला गुणवंत कामगार पुरस्कार दिला त्यानंतर भारत सरकारने कामगार कवी म्हणून रशियाला कामगार अभ्यास दौऱ्यावर संधी दिली आणि त्या काळात बालकवी म्हणून मास्को आणि ताश्कंद आकाशवाणी वरून माझी मुलाखत झाली, त्यापूर्वी आकाशवाणी मुंबई आणि रत्नागिरी वरून लहान मुलांच्या कविता प्रसारित होत होत्या चेंबूर आर.सी.एफ. येथे असलेली कामगार युनियन थळला आणल्यामुळे स्थानिक राजकीय पक्षाचे नेते कायम नाराज झाले, त्यांच्या पक्षाचे असलेले काही कामगार यांनी बरोबर माझ्या बाबतीत राजकारण खेळले. मी मात्र समाजसेवेत अखंड गुंतलो  कामगार म्हणून आयुष्यभर लक्षात राहिलेले कामगारांसाठी केलेले काम आजच्या दिवशी मनाला आनंदित करते. त्या काळात रायगड जिल्ह्यात बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांनी आर.सी.एफ. एच. ओ. सी., एच. आय. एल.  केंद्र सरकारच्या अत्यारितले कारखाने आणले. त्यामुळे अनेकांचे कल्याण झाले, एच. आय. एल. कंपनी डीडीटी पावडर तयार करणारे आणि ती कंपनी अडचणीत आली कामगार व अधिकारी यांचे पगार द्यायला कंपनीकडे पैसे राहिले नाही. त्यांच्या कर्मचारी युनियनने गुणवंत कामगार व काँग्रेस आई पक्षाचा सचिव म्हणून कार्यरत असल्याने मला विनंती पत्र दिले. माझे राजकीय गुरू रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट दत्ताजीराव खानविलकर यांच्या पत्राने केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्याकडे पाठविले. त्यांची भेट घेतली आणि आमची अडचण  सांगितली.  त्यांनी तातडीने केंद्रीय कामगार मंत्री पी. ए. संगमा यांच्याकडे पाठविले रायगडकर म्हणून तातडीने सचिवांना बोलावले बॅरिस्टर अंतुले साहेबांचे काम  सायंकाळपर्यंत थांबून कंपनीला मद्रास महानगरपालिकेची मोठी  डीडीटीची ऑर्डर देण्यात आली व कंपनीची राहिलेली कोट्यावधी रुपयाची बिले अदा करण्याचे आदेश झाले. प्रिय  संगमा साहेब आणि बॅरिस्टर ऐ.  आर. अंतुले साहेब यांचे आभार मानून आम्ही रायगड गाठले कंपनीचे शेकडो कामगार आणि अधिकारी यांचे कल्याण झाले. ते आजही पर्यंत कंपनी चालू आहे, पुढे कंपनीने 26 जानेवारीला बोलावून माझा मान सन्मान केला. हे कामगारांसाठी केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे होते असे मी मानतो.आरसीएफ सोडल्यानंतर पूर्णवेळ समाजसेवेचे कंकण हाताला बांधले महाराष्ट्र शासनाने नागरी संरक्षण दलाचा रायगडचा जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली सन 2015 पासून गुणवंत कामगार म्हणून कामगारांना होईल तेवढी मदत पत्रकारितेची लेखणीने ही न्याय देणे अभ्यास आणि निश्चय दांडगा असेल तर कामगार आपली व इतरांची प्रगती करू शकतो ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात 601 प्रत्यक्ष व्याख्याने त्यामध्ये आकाशवाणी मुंबई येथून शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा रत्नागिरी येथून युवक आणि युवतींची आपत्ती सुरक्षा सोलापूर येथून कामगारांची आपत्ती सुरक्षा कोल्हापूर येथून ज्येष्ठ नागरिकांची आपत्ती सुरक्षा  पुढे येथून महिलांची आपत्ती सुरक्षा असे लाखो नागरिकांना प्रशिक्षण साहित्य क्षेत्रात 11 पुस्तकांचे लिखाण आपत्ती व्यवस्थापनामुळे जागतिक आपत्ती 4थी, 5वी, 6वी परिषदेपर्यंत वाटचाल यामुळे महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल "आदिवासी सेवक" अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग बांधवांसाठी केलेले कार्य यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "समाज भूषण" पुरस्काराने रायगड भूषण असलेल्या गुणवंत कामगाराला त्याच्या समाजसेवेचे कौतुक केलं आहे तेव्हा कामगार बंधूंनो निवृत्त झाले आता काय करायचे असा विचार मनात  आणू नका आपण सारे बुद्धिमान आहात आपल्या बुद्धीचा वापर समाजसेवेसाठी करा आणि जमलं तर आमच्या रायगडच्या युवक फाउंडेशन सोबत या.महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🚩     आपलाच कामगार बंधू डॉ. जयपाल पाटील

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.