✍️आनंदी आनंद आपत्ती व्यवस्थापनाचा!
समाजामध्ये आपले कुटुंबासमवेत जीवन जगताना काहींना समाजसेवेची आवड असते आणि आपले गाव परिसर याचा विकास करावयाचा असल्यास कोणत्यातरी सरकार मान्यता प्राप्त राजकीय पक्षात प्रवेश करावा लागतो त्या कार्यकर्त्याचा सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्याला पक्षाचा पदाधिकारी केला जातो तो ग्राम पंचायत सदस्य सरपंच पुढे तो पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद सदस्य सभापती उपाध्यक्ष आणि अध्यक्ष होऊन पक्ष त्याला पुढे आमदार आणि खासदार म्हणून निवडणुकीत उभे करते या सर्व सापशिडीमध्ये विरोधी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी काही वेळा त्या कार्यकर्त्यावर खोट्या केसेस दाखल करून समाजात बदनामी करण्याच्या तयारीत असतात तर काही गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात होऊन न्यायालयात केस दाखल होते तेव्हा मात्र काहींना जेलमध्ये बंदी होण्याची वेळ काही जणांवर येते निकालाला काही महिने तर वर्षही जाते त्यामुळे त्याच्या गावाकडे कुटुंबाचे हाल होतात आणि जेलमध्ये राहिल्याने शिक्षित किंवा अशिक्षित असणार तरी मनावर परिणाम होऊन आता पुढे समाजात जीवन कसे जगायचे याची अनेक जणांवर आपत्ती येते असे अनेक प्रसंगात अडकलेले मित्रांच्या अनुभवावरून आपण अशा बंदी वाहनांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले पाहिजेत अशा मताचा मी झालो संपूर्ण देशभरात लाखो नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिल्याने यांच्यासाठी व्यक्तिमत्व बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कारागृह व सुधारक सेवा अंतर्गत कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखळा मुंबई यांना दिनांक 17/ ३ /2025 ला पत्र दिले. आणि वरील विषयासाठी परवानगी श्री. बाळकृष्ण जाधव स्वीय सहाय्यक कारागृह उपमहानिरीक्षक1016 दिनांक ४/४/२०२५ ला रायगडचा युवक फाउंडेशन ला अलिबाग जिल्हा कारागृहातील बंधन करिता व्याख्यान ला परवानगी दिली असून व्याख्यानाच्या वेळी कारागृह अधीक्षक, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी, शिक्षक आणि अधिकारी त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाची तारीख व वेळ अधीक्षकांना भेटून घ्यावी आतापर्यंत संपूर्ण जगभरात 594 व्याख्याने झाली असून हे व्याख्यान वेगळ्या प्रकारचे असल्याने आनंदी आनंद आहे.- रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार,
Comments
Post a Comment