✒️आमची नोंद घेतली!

मित्रांनो पत्रकार क्षेत्रात साधारण 35 वर्षाची वाटचाल, बरेच चढ उतार अनुभवले, या क्षेत्रातील अनुभवाने येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावयाची याचे कायम क्षेत्रात नव्याने येणारे पत्रकार असलेले संपादक यांना प्रकाशक म्हणून देशभरात आणि स्वतःचे दिल्लीमध्ये कार्यालय असलेल्या लीपा या संघटनेत राज्य ते देशपातळीवर पदाधिकारी, साप्ताहिक संपादक म्हणून स्मॉल न्युज पेपर ऑफ इंडिया संघटनेचा राज्य पदाधिकारी ते राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून कार्य, साप्ताहिक संपादक संघटनेचा जिल्हा राज्य पातळीवरील पदाधिकारी, भारतीय पत्रकार संघ (ए. आय. जे.) चा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्य, महाराष्ट्रातल्या संपादक पत्रकार संघासाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघटनेचा संचालक आणि महाराष्ट्रातील साप्ताहिक संपादक पत्रकार छायाचित्रकारांसाठी कार्यरत असलेल्या साहित्य संगम व दैनिक युवावताचे संस्थापक संपादक श्री. किसन भाऊ  हसे यांच्याही  संघटने  राज्य पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.हे सर्व सांगण्याचे कारण की आपण निस्वार्थपणे कार्य करीत असतो हे कोणी कौतुक करावे म्हणून नव्हे तर आपल्या मनाला आनंद मिळतो पत्रकारिते जिल्हास्तरीय व अलिबाग शहरात पहिला महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्ती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाला त्याचबरोबर पत्रकारितेत फोटोग्राफीला अन्य साधारण महत्त्व असते याचाही मार्ग शासनाच्या राज्यस्तरीय वनखात्याचा राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे हे सर्व करीत असताना रायगड जिल्हा आपत्तीने कायम त्रासलेला अशावेळी नागरिकांना कशाप्रकारे मदत करता येईल याची मनाला खंत राहत होती यासाठी महाराष्ट्र शासनाचे नागरी संरक्षण दल असते याचा स्वयंसेवक म्हणून प्रशिक्षण घेतले, त्यासाठी त्यांचा चुलत भाऊ होमगार्ड कॉलेज मुंबई येथे प्रशिक्षण घेतले, महाराष्ट्र शासनाच्या यशदा मध्ये प्रशिक्षण घेतले, भारतीय सैन्य शिखरेजिमेंट रांची झारखंड, जागतिक आपत्ती परिषद चौथी पाचवी आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण संस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास केल्याने   पत्रकार, फोटोग्राफर, वक्ता असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलाचे जिल्ह्याचे प्रमुख  श्री. मंगसुळे सर यांनी माझी त्यांच्या  वरिष्ठांमार्फत  मार्फत व जिल्हाधिकारी रायगड यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी नियुक्ती केली आणि माझे कार्य सुरू झाले. रायगड जिल्ह्यात पहिले  50 हजार नागरिकांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिल्याने रायगड जिल्हा परिषदेने मानाचा" रायगड भूषण" पुरस्कार देऊन सन्मान केला. अलिबाग कर, आमच्या जिल्ह्यातील पत्रकार मंडळी सन 2015 ला  "आपत्ती आली" म्हणून टीका टिप्पणी करावयाची, आज पुढील दोन महिन्याचे कार्यक्रमातील तारखा बुक राहू लागले आहेत, मात्र हिरे पारखणारे तज्ञ असतात तसा महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार आहे, आणि  महाराष्ट्र शासनाचा आपत्ती प्रशिक्षक असून  यासाठी संपादक श्री. किसन भाऊ असे यांनी संगमनेर मध्ये  त्यांच्या गावातील माध्यमिक विद्यालयातील 1500 विद्यार्थी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्यांचा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम आयोजित केला. सोबत थोरात यांचा साखर कारखाना एमआयडीसीतील 40 कारखानदार मालक यांनाही माझे आपत्ती सुरक्षेचे कार्यक्रम राबविले हे पत्रकार क्षेत्रातील महान कार्य होय. आज त्यांचा दूरध्वनी आला व्हाट्सअप आणि फेसबुक वर कायम संपर्कात राहून वेळोवेळी सूचना देतात माझ्या अलौकिक कार्याबद्दल मनापासून अभिनंदन केले. विशेष म्हणजे आता रायगड कारागृहातील  200 बंदीवाणांसाठी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा केली आणि आतापर्यंत  यामध्ये मुंबई आकाशवाणी वरून शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा, रत्नागिरी आकाशवाणी वरून युवक व युवतींची सुरक्षा, कोल्हापूर आकाशवाणी वरून ज्येष्ठ नागरिकांची आपत्ती सुरक्षा, सोलापूर आकाशवाणी वरून कामगारांची आपत्ती सुरक्षा आणि पुणे आकाशवाणी वरून महिलांची सुरक्षा अशी व्याख्याने देऊन महाराष्ट्रातील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचलो आहे, सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या 811 ग्रामपंचायत मध्ये माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी हा कार्यक्रम सुरू असून संपूर्ण भारतातील अशाप्रकारे नागरिकांना सुरक्षेचे धडे देणारी रायगड जिल्हा परिषद होणार आहे. मागील 25 वर्षाच्या समाजसेवेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्र शासनाने मला गुणवंत कामगार, आदिवासी सेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, शासनाचेही आभार!  देशभरात 600 कार्यक्रम  पूर्ण होऊन 1000 ग्रिनीच वर्ल्ड रेकॉर्ड कडे वाटचालीच्या शुभेच्छा देऊन आपली संघटना आपण आपत्ती व्यवस्थापन चे कार्य केले ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत व्हा यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत पुस्तक रूपाने प्रकाशित करणार असून त्याचे प्रकाशन समारंभ यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहिती दिली  माझ्या देशसेवेची श्री. किसन भाऊ असे यांनी नोंद घेतली त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाची महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिके साप्ताहिके मासिके सोशल मीडियावर फेसबुक व्हाट्सअप ट्विटर नोंद घेता त्याला प्रसिद्धी देतात त्यांचेही मनापासून आभार मानतो.  मी एवढे काय सुरक्षेचे ज्ञान देतो हे कार्यक्रमास येणारे अनुभवतात पुढील महिन्याच्या तारखा  वहीत लिहाव्या लागतात याचे श्रेय आमचे रायगडचे लोकप्रिय खासदार श्री सुनील तटकरे भाषण कलेचे गुरु महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट दत्ताजीराव खानविलकर आणि रायगडच्या जनतेसाठी काहीतरी करा असे सांगणारे  अध्यात्मिक गुरु डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा मी आभारी आहे आत्ता सत्तरीच्या उंबरठ्यावर पोहोचलो असलो तरी देशसेवा सुरू असून आपत्तीवरील 1000 व्याख्यानांचा ग्रीनिच वर्ड रेकॉर्ड निश्चितच करणार असे ध्येय आहे.  ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.